अयोध्या, मुंबई, दि.22 जानेवारी 2024 | देशभरात आज भक्तीमय वातावरण झाले आहे. केंद्र शासनाने राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आज अर्धा दिवस सुटी जाहीर केली आहे. महाराष्ट्र सरकारसह अनेक राज्यात सुटी जाहीर करण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी शहरे, रस्ते सजवण्यात आली आहेत. मंदिरांमध्ये भजन, कीर्तन सुरु आहेत. मग आपल्या कामानिमित्त जाणाऱ्या भाविकांमध्ये हा उत्साह कायम आहे. मुंबईकर चाकरमाने लोकलमध्ये भजन कीर्तन करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याचवेळी दिल्लीतील अयोध्या जाणाऱ्या विमानात भाविक श्रीराम भजन म्हणताना प्रवाशी दिसत आहे. विमानातही भजन म्हटली जात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
दिल्ली ते अयोध्या जाणाऱ्या विमानात भाविका आणि प्रवाशी श्रीरामची भजने म्हणत आहे. इंडिगोच्या विमानात राम भजनवार भाविक ठेके धरत आहेत. व्हिडिओत विमानात राम सिया राम धून गाताना लोक दिसत आहे. व्हिडिओत भगवे वस्त्र परिधान करणारा एक भाविक राम भजन म्हणत आहे. त्याला विमानात बसलेले इतर लोक प्रतिसाद देत आहे. विमानातील काही जण या क्षणाचा व्हिडिओ बनवत आहे.
#WATCH | Passengers chant Ram bhajan onboard the flight from Delhi to Ayodhya.
The Pran Pratishtha ceremony of Ram Temple will take place tomorrow in Ayodhya. pic.twitter.com/gNirg7rs1t
— ANI (@ANI) January 21, 2024
मुंबईत सरकारी कार्यालयांना सुटी आहे. परंतु मुंबई नेहमीप्रमाणे धावत आहेत. चाकरमाने आपल्या कामांवर जात आहे. यावेळी लोकलमध्ये राम भजने म्हणताना मुंबईतील चाकरमाने दिसत आहेत. विरारवरुन चर्चगेटला जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. भगवान श्री रामाचे पोस्टर लावून मुंबईकर भजने गाताना दिसत आहे.
मुंबई लोकलमध्ये भक्तीमय वातावरण, भजनांमध्ये रंगले भाविक#AyodhaRamMandir #mumbailocal pic.twitter.com/KATekIcqSy
— jitendra (@jitendrazavar) January 22, 2024
मुंबईतील जुहू बीचवर महाराष्ट्र नवनिर्माण सेवेतर्फे प्रभू श्रीरामाची २० फूट उंचीची मूर्ती बसवण्यात आली आहे. मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रभू श्री रामचंद्रांचा प्राण प्रतिष्ठा साजरा करत आहेत. आज कारसेवकांच्या मनोकामना पूर्ण होत आहेत, ही अत्यंत आनंदाची बाब असल्याचे मनसे कार्यकर्त्यांनी सांगितले.