मुंबई: राज्य सरकारने राज्यातील 25 जिल्ह्यांतील निर्बंधांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिथिलता देण्यात आली आहे. मात्र, मुंबई लोकल कधी सुरू होणार? हा प्रश्न अनिर्णित आहे. त्यावर खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच मोठं विधान केलं आहे. मुंबईची लोकल सुरू करण्याचा विचार सुरू आहे. पण जबाबदारीचं भान ठेवूनच हा निर्णय घेतला जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे लोकल सुरू होण्याच्या मुंबईकरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. (Mumbai local trains to open for all soon, says cm uddhav thackeray)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते खार एच पश्चिम विभागातील पालिका विभागीय कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलं. यावेळी त्यांनी हे दिलासादायक विधान केलं. महाराष्ट्रातील परिस्थिती संमिश्र आहे. काही ठिकाणी बऱ्यापैकी सुधारली आहे. काही ठिकाणी चिंता करायला लागू नये अशी आहे. त्यामुळे काही ठिकाणी निर्बंधात शिथिलता देण्यात आली आहे. तर काही ठिकाणी देण्यात आली नाही. याचा अर्थ असा नाही की हे कायमचं बंद राहील. लोकल सुद्धा कधी सुरू होणार? असं विचारलं जात आहे. त्याच्यावरही विचार सुरू आहे. काही गोष्टींना निर्बंधात शिथिलता दिली आहे. दुकानांच्या वेळांनाही शिथिलता दिली आहे. इतर गोष्टींनाही शिथिलता मिळेल. पण जबाबदारी घेऊन आणि जबाबदारीचं भान ठेवूनच निर्बंध उठवले जातील, असं मुख्यमंत्री म्हणाले.
जिथे जिथे लॉकडाऊनच्या निर्बंधात शिथिलता देऊ शकलो नाही तिथल्या नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना विनंती करतो की कृपया संयम सोडू नका. कोणी दुश्मन आहे आणि कोणी लाडके आहेत असं काही नाही. सर्व नागरिकांच्या जीवांची काळजी आहे. त्यामुळे या गोष्टी कराव्या लागतात, असं मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी त्यांनी लोकलबाबतही भाष्य केलं. महाराष्ट्रातील परिस्थिती संमिश्र आहे. काही ठिकाणी बऱ्यापैकी सुधारली आहे. काही ठिकाणी चिंता करायला लागू नये अशी आहे. त्यामुळे काही ठिकाणी निर्बंधात शिथिलता देण्यात आली आहे. तर काही ठिकाणी देण्यात आली नाही. याचा अर्थ असा नाही की हे कायमचं बंद राहील. लोकल सुद्धा कधी सुरू होणार? असं विचारलं जात आहे. त्याच्यावरही विचार सुरू आहे. काही गोष्टींना निर्बंधात शिथिलता दिली आहे. दुकानांच्या वेळांनाही शिथिलता दिली आहे. इतर गोष्टींनाही शिथिलता मिळेल. पण जबाबदारी घेऊन आणि जबाबदारीचं भान ठेवूनच निर्बंध उठवले जातील, असं मुख्यमंत्री म्हणाले. (Mumbai local trains to open for all soon, says cm uddhav thackeray)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 5 August 2021 https://t.co/6UUWFgHmvF #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 5, 2021
संबंधित बातम्या:
कोणी लाडका नाही, कोणी दुश्मन नाही, व्यापाऱ्यांनो, संयम सोडू नका; मुख्यमंत्र्यांचं आवाहन
(Mumbai local trains to open for all soon, says cm uddhav thackeray)