मुंबई : गेल्या 8 महिन्यांपासून बंद असलेली मुंबईकरांची लाईफलाईन 15 डिसेंबरनंतर सुरु होण्याच्या निर्णयाला पुन्हा एकदा खो मिळाला आहे. मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे येत्या डिसेंबर अखेरपर्यंत कोरोनाच्या रुग्णसंख्येवर पालिका प्रशासनाची नजर ठेवली जाणार आहे. यानंतरच लोकल सुरु करण्याबाबत राज्य सरकारला कळवले जाईल, अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली. त्यामुळे सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची मुभा थेट पुढच्या वर्षी मिळण्याची शक्यता आहे. (Mumbai Local Will Started in Next Year For Common People)
दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोवा या राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यानंतर मुंबई महापालिका कोरोनाला हरवण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. मुंबईत कोव्हिड नियंत्रणात आला आहे. मात्र डिसेंबर महिन्यापासून चाचण्या झालेल्या व्यक्तींपैकी केवळ 5 टक्के रुग्णांना कोव्हिडची बाधा झाल्याचे आढळत आहे. मात्र तरीही अद्याप कोव्हिड पूर्णपणे संपलेला नाही.
“येत्या 20 डिसेंबरपर्यंत कोव्हिड परिस्थितीचा अंदाज घेण्यात येईल. तसेच नाताळ आणि नववर्षाचा विचार करुन लोकल सुरु करण्याबाबत विचार करु,” अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली. त्यामुळे सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची मुभा थेट पुढच्या वर्षी मिळण्याची शक्यता आहे. (Mumbai Local Will Started in Next Year For Common People)
दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट आली नसली तरी कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे मुंबईकरांनी पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. मे आणि जून महिन्यात चाचणी झालेल्यांपैकी 38 टक्के रुग्ण कोरोनाबाधित आढळत होते. मात्र, आता 5 डिसेंबरपासून हे प्रमाण 5 टक्क्यांवर आले आहे. पुढील काही दिवस कोरोनाच्या आकडेवारी नजर असणार आहे. त्यानंतर लोकल सुरु करण्याबाबत राज्य सरकारला पत्र देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
(Mumbai Local Will Started in Next Year For Common People)
‘थुकरटवाडी’त पंकजा-रोहित पवार कशावर झाले लोटपोट? https://t.co/7tkecDiznB @RRPSpeaks @Pankajamunde #RohitPawar #PankajaMunde #SujayVikhe #ChalaHawaYeuDya
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 11, 2020
संबंधित बातम्या :
मुंबईत कोरोना प्रतिबंधात्मक नियम धाब्यावर, मनपा आयुक्तांची नाईट कर्फ्यू लागू करण्याची मागणी
केईएम, नायरपाठोपाठ सायन रुग्णालयातही कोरोना लसीची चाचणी, 1 हजार स्वयंसेवकांचा सहभाग