[svt-event title=”जानकरांकडून चारा छावण्यांची पाहणी” date=”04/05/2019,1:10PM” class=”svt-cd-green” ] सोलापूर : सांगोला तालुक्यातील चारा छावण्या आणि सुकलेल्या फळबागांची मंत्री महादेव जानकरांकडून पाहणी, राज्याची तिजोरी रिकामी झाली तरी दुष्काळ निवारणासाठी उपाययोजना करणार, जानकरांचं आश्वासन [/svt-event]
[svt-event title=”औरंगाबादमध्ये शिवसेनेची बैठक” date=”04/05/2019,1:03PM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक सुरु, दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी शिवसेनेने बोलावली बैठक, बैठकीत निवडणुकीचाही आढावा घेणार, बैठकीला शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित, चंद्रकांत खैरे यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर केलेल्या आरोपानंतर या बैठकीला विशेष महत्व [/svt-event]
[svt-event title=”अकोला बँकेत मध्यरात्री चोरी” date=”04/05/2019,9:06AM” class=”svt-cd-green” ] वाशिम : किन्हीराजा येथील अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत चोरी, अज्ञात चोरट्याकडून 14 लाख 91 हजार रुपायांची रक्कम लंपास, पोलीस घटनास्थळी दाखल [/svt-event]
[svt-event title=”जालन्यात बोगस खतांचा साठा जप्त” date=”04/05/2019,8:40AM” class=”svt-cd-green” ] जालना : जालन्यात बोगस खतांचा 63 लाखांचा साठा जप्त, कृषी विभागाची कारवाई, गुंडेवाडी शिवारातील राजलक्ष्मी फर्टिलायझर्सच्या गोडाऊनवर धाड, सेंद्रीय खत असल्याचे सांगून निमपॉवर नावाने खतांची विक्री, खतांच्या उत्पादकासह गोडाऊन मालकावर चंदनझीरा पोलिसांत गुन्हा दाखल [/svt-event]
[svt-event title=”राज्यातील धरणात अवघा 18 टक्केच पाणीसाठा” date=”04/05/2019,8:12AM” class=”svt-cd-green” ] राज्यातील धरणात अवघा 18 टक्केच पाणीसाठा, जलसंपदा विभागाच्या आकडेवारीने चिंता वाढली, राज्यात भीषण पाणीटंचाई ?औरंगाबाद विभागातील धरणांमध्ये अवघा 5 टक्के पाणीसाठा ?नागपूर विभागातील धरणात अवघा 10 टक्के पाणीसाठा ?नाशिक विभागात 17 टक्के पाणीसाठा ?पुणे विभागात 21 टक्के पाणीसाठा [/svt-event]
[svt-event title=”गडचिरोली हल्ला : माओवाद्यांविरोधात गुन्हा दाखल” date=”04/05/2019,8:08AM” class=”svt-cd-green” ] गडचिरोली : जांभूळखेडा येथील भुसुरुंग स्फोटासंदर्भात अखेर माओवाद्यांच्या विरोधात गुन्हा दाखल, 15 जवानांसह 16 जण बुधवारी माओवाद्यांच्या भुसुरुंग स्फोटात शहीद झाले, कंपनी चार टिपागड आणि कोरची दलमच्या माओवाद्यांच्या विरोधात पुराडा पोलीस ठाण्यात हत्या आणि देशद्रोहासह इतर गुन्हे दाखल [/svt-event]