मुंबई – भाऊ- बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतीक असलेला सण म्हणजे भाऊबीज. आज राज्यभरात भाऊबीज मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील भायखळा येथील महापौर निवासस्थानी भाऊबीज साजरी केली. यावेळी त्यांनी प्रातिनिधिक स्वरुपात आपल्या सहा कोविड योद्धे असलेल्या भावांसोबत भाऊबीजेचा सण साजरा केला. तसेच आपल्या सर्व भावांना दीर्घायुष्य लाभू दे! अशी प्रार्थना देखील महापौरांनी केली. यामध्ये वांद्रे येथील बीकेसी जम्बो कोविड सेंटरचे प्रमुख डॉ.राजेश ढेरे, सेव्हन हिल्स रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ.महारुद्र कुंभार, बँक ऑफ महाराष्ट्रच्या मुंबई दक्षिण विभागाचे महाप्रबंधक मनोज करे, बँक ऑफ महाराष्ट्र केंद्रीय कार्यालय पुणे येथील व्यवसाय बुद्धि विभागाचे उपमहाप्रबंधक अतुल जोशी, कालिदास कावले आणि भिवंडी येथील शिवस्पर्श प्रतिष्ठानचे अध्यक्ष शेखरलाल फरमन यांना भाऊबीजेसाठी महपौर निवासस्थानी निमंत्रीत करण्यात आले होते.
सर्वप्रथम महापौरांनी आपल्या या भावांची नजर उतरविली, त्यानंतर त्यांना टिळा लावून औक्षण करत लाडू खाऊ घातला. तसेच आपण मला जी भाऊबीजेनिमित्त भेट देणार आहात, ती मला न देता महापौर निधीसाठी जमा करावी असे आवाहन देखील यावेळी महापौरांनी केले. महापौरांच्या निवास्थानी मोठ्या उत्साहात हा भाऊबीजेचा सण साजरा करण्यात आला. यानंतर महापौरांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, बँक ऑफ महाराष्ट्रने कोविड आणि पुराच्या काळामध्ये धान्य व कपडे यांची मोठ्या प्रमाणात मदत केली. त्यासोबतच कोरोनाकाळात मुंबईचे रक्षणकर्ते असलेल्या डॉक्टर, परिचारका व कक्ष परिचर यांनी आपला जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांची सेवा केली आहे. त्यातील प्रातिनिधिक डॉक्टरांना आज मला “देवदूत भाऊ” म्हणून औक्षण करण्याची संधी मिळाली हे मी माझ्ये भाग्य मानते. कोरोना कळात मी मझा एक भाऊ गमावला आहे. मात्र अशाही परिस्थितीमध्ये मागे न हटता सर्वच कोविड योद्ध्यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या मदतीमुळेच आपण कोरोना सारख्या महामारीवर यशस्वी मात करू शकलो. प्रातिनिधिक स्वरुपात त्यातील सहा भावांना मी आज भाऊबीजेनिमित्त आमंत्रित केले. त्यांच्यासोबत भाऊबीज साजरी केली. माझ्या सर्व भावांना दीर्घायुष्य लाभू दे! अशी प्रार्थांना मी इश्वराकडे केल्याचे पेडणेकर यांनी सांगितले. तसेच त्यांनी सर्व मुंबईकरांना भाऊबीजेच्या शुभेच्छा देत, कोरोनाचे नियम पाळून दिवाळी साजरी करण्याचे आवाहनही केले.
हेही वाचा
दाऊदच्या साथीदारासोबत अनिल देशमुख ‘सह्याद्री’त काय करत होते?; मोहित कंबोज यांचा सवाल
आर्यन खान प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचा आरोप असणारे सुनील पाटील कोण?; वाचा सविस्तर
कंबोज यांच्या आरोपांनंतर नवाब मलिकांचं ट्विट, उद्या वानखेडे आर्मीचा पर्दाफाश करणार