येत्या रविवारी मेगा ब्लॉकची वेळ काय? घरातून बाहेर पडण्याआधी जाणून घ्या A टू Z माहिती

| Updated on: Jan 10, 2025 | 10:05 PM

मध्य रेल्वेवर येत्या रविवारी मेगा ब्लॉक असणार आहे. विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान सकाळी ८ ते दुपारी १२.३० पर्यंत पाचवी आणि सहावी लाईन बंद राहणार आहेत. त्यामुळे अनेक मेल/एक्सप्रेस गाड्यांचे डायव्हर्शन करण्यात येणार आहे. तसेच हार्बर लाईनवरही मेगा ब्लॉक असून, काही सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांना गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

येत्या रविवारी मेगा ब्लॉकची वेळ काय? घरातून बाहेर पडण्याआधी जाणून घ्या A टू Z माहिती
लोकल ट्रेन प्रातिनिधिक फोटो
Follow us on

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात येत्या रविवारी 12 जानेवारीला मेगा ब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेकडून परिपत्रक काढून याबाबत माहिती देण्यात आली आहे. मध्य रेल्वे मार्गावर दर रविवारप्रमाणे येत्या रविवारीदेखील अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान पाचवी आणि सहावी लाईन सकाळी 8 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या काळात अप मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे येथे अप जलद मार्गावर वळवल्या जातील. तर विद्याविहार स्थानकावर सहाव्या लाईनवर वळवल्या जातील आणि 10 ते 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील.

‘या’ गाड्या वळवल्या जातील

  • ट्रेन क्र. 13201 पटणा -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
  • ट्रेन क्र. 17221 काकीनाडा -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस

डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे डायव्हर्शन

डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्या विद्याविहार स्थानकावर डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. ठाणे येथे पाचव्या मार्गावर वळवल्या जातील आणि १० ते १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील.

हे सुद्धा वाचा

डाऊन मार्गावर ‘या’ गाड्या वळवल्या जातील

  • ट्रेन क्र. 11055 लोकमान्य टिळक टर्मिनस- गोरखपुर एक्सप्रेस
  • ट्रेन क्र. 11061 लोकमान्य टिळक टर्मिनस- जयनगर पवन एक्सप्रेस
  • ट्रेन क्र. 16345 लोकमान्य टिळक टर्मिनस -तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस

हार्बर मार्गावरही मेगा ब्लॉक

अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत मेगा ब्लॉक राहणार आहे. या दरम्यान वाशी येथून सकाळी १०.२५ वाजेपासून नेरुळ येथून सायंकाळी ०४.०९ वाजेपर्यंत ठाण्याच्या दिशेने सुटणाऱ्या अप ट्रान्स हार्बर लाईन सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.३५ ते सायंकाळी ४.०७ पर्यंत वाशी/नेरूळ/पनवेलच्या दिशेने डाउन ट्रान्स हार्बर सेवा रद्द होतील. हे मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.