नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या मेट्रोकडून सुखद बातमी, मुंबईकरांनी आवर्जून वाचावीच!

| Updated on: Feb 02, 2023 | 1:43 PM

नव्या मेट्रो मार्गाच्या उद्घाटनानंतर आठवडाभऱाच्या आतच 2 ए आणि 7 या मार्गावरील प्रवाशांमध्ये 10 लाखांहून अधिक घट झाल्याचं दिसून आलंय. हे अत्यंत सुखद चित्र असल्याचं म्हटलं जातंय.

नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या मेट्रोकडून सुखद बातमी, मुंबईकरांनी आवर्जून वाचावीच!
Image Credit source: social media
Follow us on

मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नुकत्याच उद्घाटन केलेल्या मेट्रो 2A आणि 7 या मार्गाबाबत मोठी बातमी आहे. या मार्ग मुंबईकरांसाठी खुला झाल्यानंतर मुंबईच्या (Mumbai) वेस्टर्न लाइनवरील (Western Line) लोकलमधील प्रवाशांची संख्या हळू हळू घटताना दिसतेय. नवीन मेट्रो (Metro) मार्गाचं उद्घाटन होण्याच्या आधीची आणि नंतरची आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार मागील आठवड्याच्या तुलनेत अंधेरी आणि दहिसर स्टेशनवरील पॅसेंजर्सची संख्या रोडावल्याचं चित्र आहे. अत्यंत गर्दी असलेल्या या भागांतील लोकल आणि रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने मेट्रोचा नवा मार्ग सुरु करण्यात आलाय. मेट्रोचं उद्घाटन झाल्यानंतर काही दिवसातच त्याचे परिणाम दिसू लागल्याने हे अत्यंत सुखद संकेत असल्याचं म्हटलं जातंय.

आकडेवारी काय सांगते?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रो लाइन्सचं उद्घाटन 19 जानेवारी रोजी केलं. तर 20 जानेवारी रोजी हा मार्ग सर्वसामान्य मुंबईकरांसाठी खुला करण्यात आला.

पश्चिम रेल्वे विभागाच्या आकडेवारीनुसार, 12 ते 19 जानेवारीदरम्यान, दहिसर स्टेशनवर 5 लाख 18 हजार 517 प्रवासी होते. तर 20 ते 26 जानेवारी दरम्यान ते 3लाख 47 हजार 838 एवढे होते. या संख्येत जवळपास 1 लाख 70 हजार 679 एवढी घट झाली आहे.

तर 12 ते 26 जानेवारी दरम्यानची आकडेवारीही देण्यात आली आहे. दहिसर येथे एकूण 8 लाख 66 हजार 355 प्रवासी होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रो लाइन्सचं उद्घाटन 19 जानेवारी रोजी केलं. तर 20 जानेवारी रोजी हा मार्ग सर्वसामान्य मुंबईकरांसाठी खुला करण्यात आला.

त्याच प्रमाणे अंधेरी स्टेशनवर 12 ते 19 जानेवारीपर्यंत 16,73,112 पॅसेंजर्स होते. 20 ते 26 जानेवारी दरम्यान पॅसेंजर्सची संख्या 11,99,666 एवढी होती. त्यानंतर 4,73,446 ने ही संख्या घसरली. अंधेरी येथे 12 जानेवारी ते 26 जानेवारीपर्यंत एकूण 28,72,778 एवढ्या प्रवाशांची नोंद झाली.

‘आताच निष्कर्ष काढणं कठीण’

मेट्रोच्या उद्घाटनानंतर पहिल्याच आठवड्यात लोकलवरील ताण कमी झाल्याचं दिसून येतंय. मात्र यासंदर्भात आताच ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचता येणार नाही, असं वक्तव्य पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केलं आहे.

हे प्रवासी नव्या मेट्रोने प्रवास करतील. त्यानंतर प्रवासाच्या गरजांनुसार, मेट्रो किती सोयीस्कर आहे, याचं मूल्यांकन करतील आणि त्यानंतर दैनंदिन प्रवास लोकलने करायचा की मेट्रोने करायचा, हे ठरवतील. त्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागेल, असे अधिकारी म्हणालेत.

मेट्रो 2A आणि 7 हा मार्ग लिंक रोड आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून जातो. पूर्व आणि पश्चिम अंधेरी-दहिसरदरम्यान याद्वारे ३५ किमीचं अंतर पार केलं जातं.

उपनगरांतील लोकल ट्रेन आणि रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्याचा उद्देश ही मेट्रो सुरु करण्यामागे आहे. एमएमआरडीएच्या मते, 2ए आणि 7 दोन्ही वाहनांच्या ट्रॅफिकमध्ये 25 टक्के घट होण्याची तसेच लोकल ट्रेनवरील ताण 10 ते 15 टक्के कमी होण्याची शक्यता आहे.

नव्या मेट्रो मार्गाच्या उद्घाटनानंतर आठवडाभऱाच्या आतच 2 ए आणि 7 या मार्गावरील प्रवाशांमध्ये 10 लाखांहून अधिक घट झाल्याचं दिसून आलंय. हे अत्यंत सुखद चित्र असल्याचं म्हटलं जातंय.