काय म्हणता, शासकीय कॅन्टीनमधून हजारो चमचे गायब, आता शोध सुरु

| Updated on: Apr 14, 2023 | 12:34 PM

मुंबई सारख्या मोठा शहराचा डोलारा सांभाळणाऱ्या मुंबई महानगर पालिकेच्या उपहारगृहाला मात्र आपला डोलारा सांभाळता येत नाही. यामुळे उपहारगृहातून गेल्या वर्षभरात जेवणाची ताटे, चमचे, ग्लास अशी हजारो भांडी गायब झाली आहेत.

काय म्हणता, शासकीय कॅन्टीनमधून हजारो चमचे गायब, आता शोध सुरु
शासकीय उपहारगृह
Image Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us on

विनायक डावरुंग, मुंबई : शासकीय कॅन्टीन अनेक कर्मचाऱ्यांसाठी सोयीचे असते. कारण या कॅन्टीनमध्ये सर्व खाद्यपदार्थ स्वस्त किंमतीत मिळत असतात. यामुळे अनेक जण या ठिकाणी असलेल्या खाद्य पदार्थांवर ताव मारतात. आता मुंबई महानगर पालिकेच्या कॅन्टीनमधील चोरीची बातमी समोर आली आहे. ही चोरी चमच्यांची आहे. फक्त चमचे गेले नाही तर जेवणाची ताटे अन् ग्लासही गायब झाले आहेत. म्हणजेच मुंबई शहराचा डोलारा सांभाळणाऱ्या मुंबई मनपाच्या उपहारगृहाला मात्र आपला डोलारा सांभाळता येत नाही. यामुळे गेल्या वर्षभरात जेवणाची ताटे, चमचे, ग्लास अशी हजारो भांडी गायब झाली आहेत.

काय आहे प्रकार

हे सुद्धा वाचा


मुंबई महापालिका मुख्यालयाच्या कॅन्टीनमधून चक्क चमचे, जेवणाच्या-नाश्ताच्या प्लेट आणि ग्लास गायब झाले आहे. महानगर पालिकेतील कर्मचारी, अधिकारी जेवण या उपहारगृहात जेवण अन् नाश्ता मागवतात. हे कर्मचारी आपल्या कार्यालयात जेवण अन् नास्ता मागावतात. परंतु खाल्ल्यानंतर ही भांडी उपहार गृहाला परत पाठवत नाहीत. कॅन्टीनच्या कर्मचाऱ्यांनी भांडी मागितल्यास काहीतरी उत्तर दिले जाते. या बनवाबनवीमुळे उपहारगृह चालक मेटाकुटीला आले असून भांडी परत करण्याचे आवाहन त्यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना केले आहे.

आता लिहिली सूचना


पालिकेतील काही कर्मचारी अधिकारी जेवण, नाश्ता आपल्या कार्यालयात मागवतात. जेवण झाल्यानंतर भांडी कार्यालयात तशीच ठेवली जातात. ती कॅन्टीनमध्ये परत केली जात नाहीत. त्यामुळे वर्षभरात हजारो भांडी कमी झाली आहे. उपहारगृहाचे ४० ते ५० हजारांचे नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे शेवटचा उपाय म्हणून उपहारगृहाच्या बाजूसच भांडी घेऊन जाऊ नका, अशी सूचना लिहिली आहे.

उपहारगृहातून भांडी घेऊन जाऊ नका 


उपहारगृहातून हजारो चमचे, ताटे, ग्लास गायब झाले आहे. यामुळे यापुढे उपहारगृहाबाहेर भांडी घेऊन जाऊ नका, असे आवाहन कर्मचारी, अधिकाऱ्यांना करण्यात आले आहे. यासंदर्भातील विनंती करणारा फलक कॅन्टीनमध्ये लावण्यात आला आहे. आता ही चमचे अन् भांडी गेली कुठे? याचा शोध कुठे घ्यावा? असा प्रश्न उपहारगृह चालकाला पडला आहे.

ही भांडी हरवली