मुंबईसाठी हा गेमचेंजर प्रकल्प, मुंबई- नवी मुंबई 2 तासांचा प्रवास 20 मिनिटांत

| Updated on: Jan 12, 2024 | 10:38 AM

India Longest Sea Bridge Atal Setu in Mumbai | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिक आणि मुंबई दौऱ्यावर असणार आहे. मुंबई ते नवी मुंबई प्रवास फक्त २० मिनिटांत सागरी सेतूमुळे होणार आहे. अटल सेतूवर अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण यंत्रणा अर्थात इंटिलिजेंट ट्राफिक मॅनेजमेन्ट सिस्टीम कार्यान्वित केली आहे.

मुंबईसाठी हा गेमचेंजर प्रकल्प, मुंबई- नवी मुंबई 2 तासांचा प्रवास 20 मिनिटांत
India Longest Sea Bridge
Follow us on

अक्षय मंकणी, मुंबई, दि. 11 जानेवारी 2024 | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई आणि नाशिक दौऱ्यावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL ) म्हणजेच अटल सागरी सेतूचे उद्घाटन करणार आहे. जगातील सर्वात मोठा सागरी सेतू हा आहे. सागरी सेतूवर ताशी १०० किमी वेगाने वाहने धावणार आहे. यामुळे मुंबई ते नवी मुंबी हा दोन तासांचा प्रवास अवघ्या २० मिनिटांत होणार आहे. शुक्रवारी लोकार्पण झाल्यानंतर तो सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे. अटल सेतूवर अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण यंत्रणा अर्थात इंटिलिजेंट ट्राफिक मॅनेजमेन्ट सिस्टीम कार्यान्वित केली आहे. या यंत्रणेच्या अंतर्गत या सागरी सेतूवर विविध प्रकारचे सुमारे ४०० कॅमेरे बसविण्यात आले आहे. त्यामुळे वेगमर्यादेचे उल्लंघन करणारी वाहने या कॅमेऱ्यात काही सेकंदात कैद होणार आहेत.

रोज धावणार ७० हजार वाहने

अटल सागरी सेतूवर दिवसाला ७० हजार वाहने धावतील, असा दावा केला जात आहे. २२ किलोमिटरचा हा सागरी सेतूमुळे रायगडात माणूस अर्धा तासांत मुंबईत पोहोचणार आहे. मुंबईसाठी हा गेमचेंजर प्रकल्प ठरणार आहे. सागरी सेतू तयार करताना अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. यामुळे वाहन क्षमता अधिक असणार आहे. या प्रकल्पाच स्टिलचा अधिक वापर केला गेला आहे.

अटल सागरी सेतूचा टोल फक्त २५०

राज्याच्या मंत्रिमंडळाने सागरी सेतूचा टोल २५० रुपयांवर केला आहे. यामुळे ५००-७०० रुपयांची बचत होणार आहे. २२ किलोमीटर लांब असलेल्या हा सागरी सेतू १६.५ किलोमीटर पाण्यावर आहे. ५.५ किलोमीटर जमिनीवर आहे. मुंबई ते नवी मुंबई, नवी मुंबई विमानतळ, मुंबई-पुणे एक्सप्रेस, मुंबई गोवा महामार्गावर लवकर जात येणार आहे. हा सेतू १५ हजार कुशल कामगारांनी तयार केला आहे. समुद्रात येणाऱ्या लाटा आणि भूंकप यांचा विचार सेतू तयार करताना केला आहे. शंभर वर्षांपर्यंत या सागरी सेतू सुस्थितीत राहणार आहे.

हे सुद्धा वाचा

पंतप्रधान नाशिकमध्ये, काळाराम मंदिरात घेणार दर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट देणारा आहे. यावेळेस पंतप्रधान प्रभू श्री राम लक्ष्मण आणि सीता यांचे पूजन करणार आहेत. दरम्यान पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त संपूर्ण मंदिराला सुंदर अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे. वंश परंपरागत पुजारी परिवाराच्या वतीने पंतप्रधानांना संकल्प सांगितला जाणार आहे.