मुंबई : राज्यात तापमान वाढले आहे. अंगाची लाहीलाही होत आहे. मग गारवा मिळेल, त्याठिकाणी गर्दी होत आहे. यामुळे राज्यातील स्विमिंग पूलमधील गर्दी मार्च महिन्यापासून वाढायला लागली आहे. युवक, युवतीप्रमाणे ज्येष्ठ मंडळीही स्विमिंग पूलमध्ये आंघोळीसाठी नेहमी जात आहे. या स्विमिंग पूलमध्ये मुंबईत एका अपघात झाला. या अपघातात एका ७२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. मुंबईतील गोरेगावमध्ये हा प्रकार घडला. यामुळे स्विमिंग पुलमध्ये आंघोळीसाठी जाताना खबरदारी घेऊनच आंघोळ करणे गरजेचे आहे.
काय घडला प्रकार
मुंबईतील स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करताना एका तरुणाने उंचावरून उडी मारली. यावेली तो सरळ एका वृद्धाच्या अंगावर पडला. या घटनेत वृद्ध गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. मृताच्या कुटुंबीयांनी तरुणावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. मुंबईच्या गोरेगावच्या पश्चिम भागातील ओझोन जलतरण तलावात ही घटना घडली.
ती उडी सरळ त्यांच्या अंगावर
72 वर्षीय विष्णू सामंत येथे आंघोळ करण्यासाठी पोहोचले होते. या ठिकाणी 20 वर्षीय तरुणही पोहोचला होता. त्याने अचानक उंचावरून स्विमिंग पूलमध्ये उडी मारली. तो थेट विष्णू सामंत यांच्यावर पडला. या अपघातात विष्णू सामंत गंभीर जखमी झाले. त्याच्या मानेवर आणि शरीराच्या इतर अनेक भागांवर जखमा झाल्या. त्यांना जखमी अवस्थेत जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.
त्या तरुणावर आरोप
या घटनेनंतर विष्णू सावंत यांच्या पत्नीने तरुणावर निष्काळजीपणे उडी मारल्याचा आरोप केला आहे. विष्णूच्या मृत्यूला तरुणच जबाबदार असल्याचा दावा सावंत यांच्या पत्नीने केलाय.
कर्नाटकमध्ये झाला होता अपघात
कर्नाटकातील बेंगळुरू येथे यापूर्वी अपघात झाला होता. येथे दोन मित्रांचा जलतरण तलावात बुडून मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेली दोन्ही मुले 13 वर्षांची होती. दोघेही शाळा बंक करून तलावात पोहायला गेले. दोन्ही मृत्यू निष्काळजीपणामुळे झाले आहेत.
चांगला व्यायम प्रकार
तंदुरुस्त राहण्यासाठी पोहणे चांगला व्यायाम आहे. विशेष म्हणजे याच तलावात अनेक खेळाडू देखील सरावासाठी येत असतात. तापमान वाढतच चालल्याने नागरिकांचेही पाऊले हळूहळू वळू लागले आहे. तापमान वाढत असल्यामुळे 40 स्विमिंग करून काहीसा गारवा मिळवण्यासाठी आणि व्यायाम देखील होत असल्याने नागरिकांचा प्रतिसाद वाढला आहे. यातून पालिकेच्या तिजोरीला हातभार लागत असल्याने पालिकेनेही मोठ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे. अनुभवी प्रशिक्षक, चांगल्या दर्जाचे पाणी उपलब्ध करून दिले आहे.