Dress Code : जीन्स, टी-शर्टला पण रामराम; हिजाबवर तर अगोदरच बॅन, मुंबईतील या महाविद्यालयाने सक्तीने लागू केला ड्रेस कोड

| Updated on: Jul 02, 2024 | 4:43 PM

Dress Code For College : मुंबईतील या महाविद्यालयात विद्यार्थी आता फाटकी जीन्स, टी शर्ट घालून येऊ शकणार नाहीत. तर मुली हिजाब-बुरखा या धार्मिक पेहरावात येऊ शकणार नाही. विद्यार्थ्यांवरील या ड्रेसकोडची सध्या देशात चर्चा सुरु आहे.

Dress Code : जीन्स, टी-शर्टला पण रामराम; हिजाबवर तर अगोदरच बॅन, मुंबईतील या महाविद्यालयाने सक्तीने लागू केला ड्रेस कोड
मुंबईतील महाविद्यालयात ड्रेस कोड
Follow us on

मुंबईतील चेम्बूर भागातील एन जी आचार्य आणि डी.के मराठे कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्समध्ये ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. याविषयीची नवीन मार्गदर्शक तत्वे लागू करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी महाविद्यालयीन परिसरात रिप्ड जीन्स, फाटकी जीन्स, टी-शर्ट वा विचित्र पेहराव करुन येऊ शकत नाहीत. आता विद्यार्थ्यांना सामान्य पेहराव करुन कॉलेजमध्ये येता येईल. मुलींच्या ड्रेस कोडबाबतही महाविद्यालयांनी सक्त पाऊल टाकले आहे.

प्रवेशद्वारातूनच बाहेरचा रस्ता

कॉलेज प्रशासनाने एक नोटीस जारी केली आहे. त्यानुसार, सर्व विद्यार्थी साधारण कपड्यातच महाविद्यालयात येऊ शकतात. ज्या विद्यार्थ्यांनी ड्रेस कोडचे पालन केले नाही, त्यांना प्रवेशद्वारातूनच बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. सोमवारी याविषयीची नोटीस देण्यात आली. जे विद्यार्थी काल कॉलेजमध्ये आले नाही. त्यांना याविषयी काही माहिती नव्हती. आज ते कॉलेजमध्ये आले तर त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. याशिवाय महाविद्यालयात हिजाब, बुर्का वा इतर धार्मिक पेहराव करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

हायकोर्टाचा ठोठावला दरवाजा

हिजाब, बुर्का यावर बंद घातल्यानंतर काही विद्यार्थींनीनी हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. 9 विद्यार्थिनींनी याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने या याचिका फेटाळल्या. कॉलेज ड्रेसचे पालन न केल्याने त्याचा परिणाम अभ्यासावर होत असल्याचा युक्तीवाद करण्यात आला होता. न्यायालयाने याचिका फेटाळल्याने अनेक तरुणींना कॉलेज ड्रेस कोडचे पालन करावे लागणार आहे.

सकाळी कॉलेजचे दरवाजे 7:40 मिनिटांनी बंद होतील तर सकाळी पुन्हा 9:50 वाजता पुन्हा उघडतील. विद्यार्थ्यांनी साध्या पेहरावात या वेळेपूर्वी महाविद्यालयात हजर राहण्याचे निर्देश आहे. तसेच विद्यार्थ्यांना 75 टक्के उपस्थिती नोंदविणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांच्या अतरंगी कपड्यांविषयी कॉलेज प्रशासनाने महत्वाचे पाऊल टाकले आहे. मुंबईतील या महाविद्यालयाच्या प्रशासनाने 27 जून रोजी जारी केलेल्या ड्रेस कोड आणि इतर नियमानुसार फाटलेल्या जीन्स, टी-शर्ट, उघडे कपडे आणि जर्सीला परवानगी दिली जाणार नाही. विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये फॉर्मल आणि सभ्य पोशाख परिधान करावं असं म्हटले आहे.