‘डोनेशन गँग’च्या मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या

| Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM

ब्रिजभान जैसवार, टीव्ही 9 मराठी, मुंबई : खोट्या संस्थांच्या नावाने पावत्या फाडून वर्गणी गोळा करणाऱ्या ‘डोनेशन गँग‘च्या मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. कुठेच संस्था किंवा कार्यालय नसताना लोकांच्या घरोघरी जाऊन, ही गँग लोकांना भावनिक आवाहनं करुन पैसे गोळा करत असे आणि डमी पावती देत असे. ‘डोनेशन गँग‘ नेमकं काय करत असे? तुम्ही जर धार्मिक प्रवृत्तीचे […]

डोनेशन गँगच्या मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Follow us on

ब्रिजभान जैसवार, टीव्ही 9 मराठी, मुंबई : खोट्या संस्थांच्या नावाने पावत्या फाडून वर्गणी गोळा करणाऱ्या डोनेशन गँगच्या मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. कुठेच संस्था किंवा कार्यालय नसताना लोकांच्या घरोघरी जाऊन, ही गँग लोकांना भावनिक आवाहनं करुन पैसे गोळा करत असे आणि डमी पावती देत असे.

डोनेशन गँग नेमकं काय करत असे?

तुम्ही जर धार्मिक प्रवृत्तीचे असाल आणि दान-धर्म करत असाल किंवा तशी तुमची इच्छा असेल तर जरा जपून, कारण सध्या दान-धर्माच्या नावाखाली खंडणी उकळली जात असल्याचा समोर आला आहे. अनाथ मुलांचे पालपोषण आणि त्यांना शिकवण्यासाठी आम्ही आश्रम चालवतो. त्यामुळे पैसे  दान करुन हातभार लावा. देवीचे मोठे मंदिर आहे, भंडाऱ्यासाठी अन्नदान करा, असे सांगत डोनेशन गँग लोकांना फसवत असे.  

अशी जाळ्यात सापडली डोनेशन गँग

मुंबईतील वांद्रे येथील जसलोक गारमेंटमध्ये दोघे आरोपी गेले. अनाथाश्रम चालवत असल्याचे सांगत त्यांनी वाकोल्यातील एका आश्रमाचं नाव असलेली पावती पुस्तक या दुकानदाराला दाखवलं. दुकानदार पैसे देण्यास टाळाटाळ करु लागल्याने हे दोघे त्याच्यावर जबरदस्ती करु लागले. यामुळे या दुकानदाराला संशय आला. त्यांनी दिलेली पावतीही बोगस वाटल्याने दुकानदाराने निर्मल नगर पोलिसांत तक्रार केली. तपासामध्ये पावतीमध्ये नमूद केलेला कोणतेच अनाथ आश्रम अस्तित्त्वात नसल्याचे समोर आले. दोन्ही आरोपींनी व्यापाऱ्यांकडून 20 हजार मागितले, मात्र वाटाघाटी करुन 8 हजार रुपये घेतले.

पोलिस या प्रकरणाच्या खोलात शिरले, कसून तपास केला, तेव्हा लक्षात आले की, भावनिक आवाहनं करुन लोकांकडून पैसे उकळणाऱ्यांची मोठी गँग आहे. शिवाय, या गँगने मुंबईत अनेकांना लुबाडल्याचेही समोर आले.

पोलिसांनी या गँगच्या काही जणांच्या मुसक्या आवळल्य असल्या, तरी मुंबईकरांनी सतर्क राहण्याची नितांत गरज आहे. कारण आपल्या संवेदनशीलतेचा आणि धार्मिक भावनांचा गैरफायदा घेत, डोनेशन गँग फसवू शकते.