mumbai police : तब्बल दोन महिन्यांनंतर ‘एन्काऊंटर स्पेशलिस्ट’ दया नायक यांना मिळाली पोस्टींग

| Updated on: May 21, 2023 | 1:37 PM

encounter specialist daya nayak : दोन महिन्यांपासून पोस्टींगच्या प्रतिक्षेत असणाऱ्या दया नायक यांना नवीन जागा मिळाली आहे. त्यांनी सूत्रही स्वीकारली आहे. यासंदर्भात टि्वट करत त्यांनी माहिती दिली. यावेळी अन्य पाच जणांनाही पोस्टींग दिलीय.

mumbai police : तब्बल दोन महिन्यांनंतर एन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायक यांना मिळाली पोस्टींग
daya nayak
Follow us on

मुंबई : एन्काऊंटर स्पेशलिस्ट म्हणून ओळख असलेल्या दया नायक यांना तब्बल दोन महिन्यांनंतर नवी पोस्टिंग मिळाली आहे. दया नायक यांची २८ मार्च रोजी मुंबई एटीएसमधून बदली झाली होती. परंतु त्यानंतर त्यांची नवीन ठिकाणी नियुक्ती केली गेली नव्हती. दीर्घ कालवाधीपर्यंत पोस्टींगची वाट पाहिल्यानंतर दया नायक यांना नवीन जबाबदारी मिळाली आहे. ही जबाबदारी कोणती आहे? यासंदर्भात त्यांनीच टि्वट करत माहिती दिली आहे. तसेच आपल्या सर्वश्रेष्ठ क्षमतेप्रमाणे मुंबई पोलीस दलाची सेवा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कुठे मिळाली जबाबदारी

हे सुद्धा वाचा

दया नायक यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत पाठवण्यात आले आहे. नायक यांनी गुन्हे शाखेचा पदभार शनिवारी २० मे रोजी स्वीकारला. त्यानंतर त्यांनी टि्वट करत त्याची माहिती दिली. त्यांनी केलेल्या टि्वटमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र एटीएससोबत तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. त्यानंतर आता मुंबई क्राईम ब्रॅन्चमधील नवीन जागेवर रुजू झाला आहे. सर्वांच्या अपेक्षांची पुर्तता करत माझ्या सर्वश्रेष्ठ क्षमतेने मुंबई पोलिसांची सेवा करेल.

अन्य पाच अधिकाऱ्यांना पोस्टींग

दया नायक यांच्यांबरोबर अन्य पाच अधिकाऱ्यांनादेखील नवीन पोस्टिंग देण्यात आली आहे. मानखुर्द, मरीन ड्राईव्ह, कांदिवली आणि मुंबई वाहतूक पोलिसांमध्ये त्यांना पोस्टिंग दिली आहे.

२८ मार्चला झाली होती बदली

दया नायक यांची २८ मार्चला महाराष्ट्र एटीएसमधून मुंबई पोलिसात बदली झाली होती. तेव्हापासून त्यांना नवीन पोस्टिंग मिळाली नव्हती. ते पोस्टिंगच्या प्रतीक्षेत होते. तीन वर्षे ते महाराष्ट्र एटीएसमध्ये कार्यरत होते. आता तब्बल दोन दशकांच्या दीर्घ कालावधीनंतर एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत आले आहेत. यापूर्वी १९९९ ते २००३ या कालावधीत ते अंधेरी सीआययूमध्ये तैनात होते. त्यावेळी मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत होती. त्यानंतर त्यांना कांदिवली पोलीस ठाण्यात पोस्टिंग मिळाली.