मुंबई पोलीस हे नेहमी संकटसमयी धावून जाणारे आहेत. मुंबई पोलिसांनी नेहमीच त्यांच्या कर्तृत्वातून ते सिद्ध करुन दाखवलं आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांचं संपूर्ण जगात नाव आहे. मुंबई पोलिसांच्या या कतृत्वाचा प्रत्यय आज मरीन ड्राईव्ह इथे फिरायला आलेल्या नागरिकांनादेखील आला आहे. एक महिला पाय घसरुन मरीन ड्राईव्हच्या कट्ट्यावरुन पाय घसरुन पडली. यावेळी महिलेने आणि तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी आरडोओरड केला. या आरडाओरडचा आवाज ऐकून परिसरात असलेले दोन पोलीस कर्मचारी तिथे धावून आले. त्यांनी कुठलाही मागचापुढचा विचार न करता थेट समुद्रात उडी मारली आणि महिलेचे प्राण वाचवले.
मरीन ड्राइव्हवर पाय घसरून एक महिला समुद्रात पडली. दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी या महिलेचे प्राण वाचवले आहेत. वृद्ध महिलेला वाचवण्यासाठी धाडसी मुंबई पोलीस हवालदाराने अरबी समुद्रात उडी मारली. ही महिला भरतीच्या वेळी आज मरीन ड्राइव्हच्या भिंतीवरून घसरली आणि समुद्रात पडली. लोकांनी आरडाओरडा केला तेव्हा मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला जोडलेले दोन कॉन्स्टेबल किरण ठाकरे आणि अनोल दहिफळे यांनी काहीही विचार न करता लगेच पाण्यात उडी मारली.
असामाजिक कृत्ये, सार्वजनिक सुरक्षा आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांची एक व्हॅन सामान्यत: मरीन ड्राईव्ह परिसरात दररोज तैनात असते. दरम्यान, महिलेवर एका स्थानिक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सुंदर महल जंक्शनजवळ ही घटना घडली आणि बचावकार्य सुमारे 20 मिनिटे चालले. दोन्ही पोलिसांनी रिंग, टायर आणि सेफ्टी दोरी वापरून जलद रेस्क्यू ऑपरेशन केले. त्यामुळे महिलेचे प्राण बचावले. यानंतर महिला पोलीस कॉन्स्टेबलने महिलेला बाहेर काढून जीटी हॉस्पिटलमध्ये नेले.