मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंगे उतरवण्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं. महाराष्ट्र सरकारनं मशिदीवरील भोंगे उतरवण्याबाबत निर्णय न घेतल्यास मशिदी समोर हनुमान चालिसा दुप्पट आवाजात लावू, अशा इशारा ठाकरे यांनी दिला होता. यानंतर मनसेच्या चांदिवली विधानसभा मतदारसंघातील महेंद्र भानुशाली यांनी आज सकाळी त्यांच्या कार्यालयाबाहेर भोंगे लावले होते. चिरागनगर पोलिसांनी (Police) मनसे कार्यकर्त्यांना अगोदर समज दिली. पोलिसांनी समज दिल्यानंतरही भोंगे न उतरवल्यामुळं अखेर पोलिसांनी मनसेच्या कार्यालयाबाहेर लावलेले भोंगे उतरवले आहेत. मनसेचे महेंद्र भानुशाली यांनी पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याची माहिती देखील समोर आलं आहे.
मुंबईच्या घाटकोपरमधील मनसे कार्यायलयाबाहेरील भोंगे पोलिसांनी उतरवले आहेत. पोलिसांनी येऊन मनसे कार्यालयाबाहेरील भोंगे पोलिसांनी काढले आहेत. मशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा आम्ही त्यासमोर हनुमान चालिसा लावू, असं राज ठाकरे म्हणाले. पोलिसांनी अगोदर समज देऊन त्यानंतर भोंगे उतरवण्यात आल्याची माहिती आहे. मनसेचे चांदिवली विभागातील महेंद्र भानुशाली यांच्या कार्यालयासमोरील झाडावर लावण्यात आलेले भोंगे उतरवण्यात आले आहेत. मनसेचे महेंद्र भानुशाली यांनी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना चिरागनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे. कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता भोंगे लावल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. याघटनेवरुन राजकारण वाढण्याची शक्यता आहे. सत्ताधारी पक्षाकडून ही कारवाई करण्यात आल्याची भावना मनसे कार्यकर्त्यांमध्ये आहे. पोलिसांनी या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. घाटकोपर मधील चांदिवली विधानसभा क्षेत्रात महेंद्र भानुशाली यांच्या कार्यालयाबाहेर भोंगे लावण्यात आले होते. सकाळी मनसे कार्यकर्ते देखील जमले होते.
राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील सभेत हनुमान चालिसा लावण्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं. त्यानंतर महेंद्र भानुशाली यांनी त्यांच्या चांदिवली येथील कार्यालयाबाहेर भोंगे लावले होते. सकाळी कार्यालयाबाहेर ढोल ताशे देखील लावण्यात आले होते. अखेर पोलिसांनी मनसेच्या कार्यालयाबाहेरील भोंगे जप्त केले आहेत. तर, महेंद्र भानुशाली यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दुसरीकडे लाऊडस्पीकर आणि इतर साहित्य पोलिसांनी जप्त केलं आहे.
Ramzan 2022 : सेहरी आणि इफ्तारच्या वेळी आहारात या गोष्टींचा समावेश करा, दिवसभर ऊर्जा राहील!