मुंबई पोलिसांच्या या ट्विटवरून तुम्हाला काय समजलं? नशा करू नका सांगण्यासाठी भन्नाट Tweet

| Updated on: Dec 10, 2020 | 9:21 AM

जगातील सर्वात उंच पर्वताचा फोटो शेअर करत मुंबई पोलिसांनी एक कॅप्शन लिहिलं आहे.

मुंबई पोलिसांच्या या ट्विटवरून तुम्हाला काय समजलं? नशा करू नका सांगण्यासाठी भन्नाट Tweet
Follow us on

मुंबई : ट्विटरवर जर सगळ्यात सक्रिय पोलीस असतील तर ते मुंबई पोलीस आहेत. ते नेमही नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि महत्त्वाच्या सूचना देण्यासाठी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. वेळोवेळी अनोख्या ट्विटमुळे मुंबई पोलिसांची चर्चा होत असते. इतकंच नाही तर सोशल मीडियावर ट्रेंड आणि मेम्स ट्रेंडिंगच्या माध्यमातूनही मुंबई पोलीस सामान्य लोकांना जागरूक करत असतं. मुंबई पोलिसांचे ट्वीटही जोरदार व्हायरल होत असतात. आताही असंच ट्वीट भन्नाट व्हायरल झालं आहे. (mumbai police tweet mount everset creative goes viral on social media)

मुंबई पोलिसांनी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे की, जगातील सर्वात उंच डोंगर माउंट एव्हरेस्ट नुकताच थोडा उंच झाला आहे. ही बातमी तुम्ही ऐकलीच असेल. खरंतर, नेपाळ आणि चीनने संयुक्तपणे जाहीर केलं आहे की, एव्हरेस्टचा आकार बदलला आहे. यामध्ये एव्हरेस्टची नवीन उंची 8,848.86 मीटर असल्याचं सांगण्यात आहे.

जगातील सर्वात उंच पर्वताचा फोटो शेअर करत मुंबई पोलिसांनी एक कॅप्शन लिहिलं आहे. “Only #MountEverest can get away with getting high!. याचा अर्थ असा की जर तुम्ही दारूच्या नेशत हाय झाले असाल तर तुम्ही नक्कीच पकडले जाऊ शकता. कारण फक्त माउंट एव्हरेस्ट आमच्यापासून वाचू शकला आहे. या ट्विटला मुंबई पोलिसांनी #SayNoToDrus आणि #HoshMeinAao चा हॅशटॅग वापरला आहे.

या पोस्टला आतापर्यंत जवळपास 750 लाईक्स मिळाल्या आहेत. इतकंच नाही तर या मजेदार ट्विटवर अनेकांनी आपली प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका ट्विटर वापरकर्त्याने म्हटलं आहे की, “तुमच्याकडे नेहमीच बौद्धिक उत्तरं असलेले लोक असतात. आम्हाला तुमच्या सेवांचा आणि वचनबद्धतेचा अभिमान आहे आणि आम्ही त्याची जाणीव ठेऊ, ” तर काहींनी ” मुंबई पोलिसांच्या या ट्विटवरून तुम्हाला काय समजलं? असा प्रश्न विचारला आहे.

मुंबई पोलिसांनी त्यांच्या ट्वीटद्वारे लोकांना दारूपासून आणि व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यांचं हे हटके ट्वीट नागरिकांच्या चांगलंच पसंतीस पडलं आहे. अनेकांनी मुंबई पोलिसांच्या सर्जनशीलतेचं कौतुकही केलं आहे. (mumbai police tweet mount everset creative goes viral on social media)

इतर बातम्या – 

केईएम, नायरपाठोपाठ सायन रुग्णालयातही कोरोना लसीची चाचणी, 1 हजार स्वयंसेवकांचा सहभाग

…म्हणून हॉटेल ताज पॅलेसची 8 कोटी 85 लाखांची थकबाकी पालिकेकडून माफ

(mumbai police tweet mount everset creative goes viral on social media)