Mumbai Power Cut | मुंबईतील वीज गायब, नेमकं कारण काय?

| Updated on: Oct 12, 2020 | 11:17 AM

अचानक लाईट गेल्यामुळे मुंबईतील पश्चिम आणि मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अनेक लोक ट्रेन सध्या ट्रॅकवर उभ्या आहेत.

Mumbai Power Cut | मुंबईतील वीज गायब, नेमकं कारण काय?
Follow us on

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई आणि लगतच्या परिसरातील अनेक भागांतील वीजप्रवाह सोमवारी सकाळी अचानकपणे खंडित झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लालबाग, परळ, अंधेरी, दादर, ठाणे, वडाळा आणि नवी मुंबई या भागातील लाईट गेली आहे. ग्रिड फेल्युअरमुळे संपूर्ण शहरात लाईट गेली असल्याची माहिती समोर येत आहे. अचानक लाईट गेल्यामुळे मुंबईतील पश्चिम आणि मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अनेक लोक ट्रेन सध्या ट्रॅकवर उभ्या आहेत. याशिवाय, मुंबई परिसरात असणाऱ्या कॉर्पोरेट कार्यालयांमधील कामकाजही लाईट गेल्यामुळे ठप्प झाले आहे. (mumbai power cut because of grid failure in mumbai city )

मुंबई सिस्टमला वीज पुरवठा करणाऱ्या अनेक लाईन्स आणि ट्रान्सफॉर्मरचं ट्रिपिंग आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई आणि लगतच्या परिसरात तब्बल 360 मेगावॉटचा वीजपुरवठा खंडीत झाला आहे. तर हा बिघाड दुरुस्त करण्याचं काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

लाईट जाण्याचं कारण काय?
महापारेषणच्या 400 KV कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट 1 देखभाल-दुरुस्ती सुरू होती. यावेळी सर्व भार सर्किट 2 वर होता. मात्र सर्किट 2 मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई व ठाणे मधील बहुतांश भाग प्रभावित आहे. बेस्टच्या काही अधिकाऱ्यांनी ग्रीड फेल्युअरमुळे हा प्रकार घडल्याची शक्यता वर्तविली आहे. मात्र, सध्या वीज पुरवठा करणाऱ्या सगळ्या यंत्रणा या बिघाडाचे कारण शोधण्यासाठी युद्धपातळीवर कामाला लागल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी मुंबईच्या काही भागांमध्ये अशाचप्रकारे वीजपुरवठा खंडित झाल्याचा प्रकार घडला होता. त्यावेळी दोन ते तीन तासांत वीजपुरवठा सुरळीत झाला होता. मात्र, आताचा बिघाड तुलनेत मोठा असल्याने मुंबईचा वीजपुरवठा सुरळीत होण्यास आणखी किती कालवधी लागेल, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. (mumbai power cut because of grid failure in mumbai city )

मुंबईत कोणकोणत्या भागात वीज गायब?
दादर
लालबाग
परळ
प्रभादेवी
वडाळा
ठाणे
नवी मुंबई
पनवेल
बोरिवली
मालाड
कांदिवली

बत्ती गुल, सर्व काही जागच्या जागी थांबलं
मुंबईची बत्ती गुल झाल्यामुळे सर्व काही जागच्या जागी थांबलं. वीजेअभावी रेल्वेच्या तिन्ही लाईन ठप्प झाल्या. तीनही मार्गावरील लोकल आहे त्या ठिकाणी थांबल्या. नेमक्या लोकल का थांबल्या हे प्रवाशांनाही काहीवेळ समजत नव्हतं.

इतर बातम्या –

Fact Check : केंद्र सरकार प्रत्येकाच्या खात्यात जमा करणार 90 हजार रुपये?, वाचा काय आहे सत्य

डिस्काऊंटसोबत खरेदी करा स्वस्त सोनं, आजपासून सुरू होतेय सरकारी योजना

(mumbai power cut because of grid failure in mumbai city )