मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक
मुंबईत आणि उपनगरात सध्या पाऊस पडत आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईत पुढच्या काही दिवसांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईत नुकतंच चार दिवसांपूर्वी पडलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा ठप्प केली होती. तसेच जनजीवनही विस्कळीत केलं होतं. त्यामुळे आधीच पाऊस सुरु असताना येत्या रविवारी नेहमीप्रमाणे मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे तुम्ही रविवारी घराबाहेर पडणार असाल आणि रेल्वेने प्रवास करणार असाल तर तुम्ही मेगाब्लॉकचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावं. अन्यथा तुम्हाला मनस्तापाला सामोरं जावं लागू शकतं. रेल्वे प्रशासनाकडून याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
मध्य रेल्वे मार्गावर येत्या रविवारी 14 जुलैला विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी त्याच्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक असणार आहे. रेल्वे विभागाने प्रसिद्धी पत्रक काढत याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. मध्य रेल्वे मार्गावर ठाणे ते दिवा दरम्यान 5वी आणि 6वी लाईन सकाळी 10.50 वाजेपासून ते दुपारी 03.20 पर्यंत कामकाज सुरु राहील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात येत आहे.
उपनगरीय सेवांचे वळण
मेगा ब्लॉकच्या आधी डाऊन मार्गावर जलद/सेमी जलद बदलापूर लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०९.४६ वाजता सुटेल. तर मेगाब्लॉक नंतर आसनगाव लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०२.४२ वाजता सुटेल. या लोकल ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि त्याव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकावर थांबतील. त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यापर्यंत आणि नियोजित आगमनापेक्षा १० मिनिटांनी गंतव्यस्थानावर पोहोचेल.
मेगा ब्लॉकआधी अंबरनाथ लोकल कल्याण येथून १०.२८ वाजता सुटेल. तर मेगाब्लॉक नंतर बदलापूर लोकल कल्याण येथून ०३.१७ वाजता सुटेल. मेगा ब्लॉक दरम्यान अप जलद/सेमी जलद लोकल कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि त्याव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकावर थांबतील. त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर आणि पुढे ठाणे स्थानकावरील अप जलद लाईनवर पुन्हा वळवण्यात येईल आणि नियोजित आगमनापेक्षा १० मिनिटे उशिरा गंतव्यस्थानावर पोहोचेल.
अप मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे वळण
- पुढील अप मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि गंतव्यस्थानावर १० ते १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.
- ट्रेन क्रमांक 12140 नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सेवाग्राम एक्सप्रेस
- ट्रेन क्रमांक 22160 चेन्नई-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
- गाडी क्रमांक 22226 सोलापूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस
- ट्रेन क्रमांक 12168 बनारस-लोकमान्य टिळक टर्मिनस अतिजलद एक्सप्रेस
- ट्रेन क्रमांक 12321 हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेल
- ट्रेन क्रमांक 12812 हटिया-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
- ट्रेन क्रमांक 11014 कोईम्बतूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
- ट्रेन क्रमांक 12142 पाटलीपुत्र-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
- ट्रेन क्रमांक 12294 प्रयागराज-लोकमान्य टिळक टर्मिनस दुरांतो एक्सप्रेस
- ट्रेन क्रमांक 11080 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
- ट्रेन क्रमांक 11060 छपरा-एलटीटी एक्सप्रेस
- ट्रेन क्रमांक 12164 चेन्नई-लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस
- ट्रेन क्रमांक 12162 आग्रा कँट-लोकमान्य टिळक टर्मिनस लष्कर एक्सप्रेस
डाउन मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे वळण
- खालील डाउन मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि त्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावतील.
- ट्रेन क्रमांक 11055 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर एक्सप्रेस
- ट्रेन क्रमांक 11061 लोकमान्य टिळक टर्मिनस-जयनगर एक्सप्रेस
- ट्रेन क्रमांक 17222 लोकमान्य टिळक टर्मिनस-काकीनाडा एक्सप्रेस
- ट्रेन क्रमांक 11071 लोकमान्य टिळक टर्मिनस-बलिया कामायनी एक्सप्रेस
- ट्रेन क्रमांक 13202 लोकमान्य टिळक टर्मिनस-पटना एक्सप्रेस
मेमू सेवा स्थगित
- मेमू क्रमांक 01339 वसई रोड-दिवा वसई रोडवरून सकाळी ०९.५० वाजता सुटणारी कोपरपर्यंत (सकाळी १०.३१ वाजता पोहोचेल) चालेल आणि कोपर आणि दिवा स्थानकांदरम्यान रद्द राहील.
- मेमू क्रमांक 01341 वसई रोड-दिवा वसई रोडवरून दुपारी १२.५५ वाजता सुटणारी गाडी कोपरपर्यंत (दुपारी ०१.३७ वाजता पोहोचेल) चालेल आणि कोपर आणि दिवा स्थानकांदरम्यान रद्द राहील.
- मेमू क्रमांक 01340 दिवा-वसई रोड कोपर येथून सकाळी ११.४५ वाजता सुटेल आणि वसई रोडकडे चालेल, दुपारी १२.३० वाजता पोहोचेल आणि दिवा ते कोपर स्थानकांदरम्यान रद्द राहील.
- मेमू क्रमांक 01342 दिवा-वसई रोड कोपर येथून दुपारी ०२.४५ वाजता सुटेल आणि वसई रोडपर्यंत चालेल, दुपारी ३.२५ वाजता पोहोचेल आणि दिवा आणि कोपर स्थानकांदरम्यान रद्द राहील.
- मेमू क्रमांक 50104 रत्नागिरी-दिवा जलद पॅसेंजर पनवेल येथे स्थगित होईल.
सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्ग
- पनवेल/बेलापूर/वाशीसाठी सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे सुटणाऱ्या पनवेल/बेलापूर/वाशीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
- ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-कुर्ला आणि पनवेल-वाशी या भागांवर विशेष उपनगरीय गाड्या धावतील.ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.
- ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.
डाउन हार्बर मार्गावर:
- ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल पनवेल लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१८ वाजता सुटेल.
- ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी ३.४४ वाजता सुटेल.
अप हार्बर मार्गावर:
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल सकाळी १०.०५ वाजता पनवेल येथून सुटणार आहे.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल दुपारी ३.४५ वाजता पनवेल येथून सुटणार आहे.
- हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना विनंती करण्यात आली आहे की, त्यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे.