मुंबईसह उपनगरात रात्रीपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईच्या सर्व उपनगरात पावसाने धुमशान घातलं. जवळपास पाच-सहा तास तुफान पाऊस बरसला. मुंबईला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. रात्रभर मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे रस्त्यांना नद्यांचा स्वरुप आलेले पाहायला मिळालं. पावसाने अनेक ठिकाणी पाणी तुंबलं. सखल भागात पाणी साचलंय. अनेक ठिकाणी गाड्या पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळालं तर सकाळी वाहतूक कोंडीही झालेली पाहायला मिळतीय.
ठाणे : घोडबंदर रोड येथील मानपाडा मुल्ला भाग येथील कॉसमॉस इमातीतील संरक्षण भिंत कोसळून 5 चारचाकी आणि 5 दुचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी आपत्तीव्यवस्थापनासह अग्निशमन दल तसेच jcb दाखल झाली आहे. कोणतीही हानी झाली नसून गाड्यांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे
जालना : जिल्ह्यातील मंठा, घनसावंगी तालुक्यात 5 दिवसानंतर अवकाळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतात पाणी साचले तर अनेक घरांचे नुकसान झाले आहे. तसेच जालना जिल्ह्यातील परतूर मध्येही काही ठिकाणी पाऊस पडला आहे.
ठाणे : उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर परिसरात पाऊस
अद्याप कुठेही पाणी साचलेलं नाही
कल्याण डोंबिवलीत मुसळधार पाऊस सुरु, तसेच अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगरातही पाऊस सुरु, पण अद्याप कुठेही पाणी साचल्याची माहिती नाही
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील दापोडे गावात घरांमध्ये शिरले पाणी
अनेक कुटुंबियांचे अत्यावश्यक साहित्य पाण्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष
पुणे -पर्यटनबंदीचा आदेश झुगारून पर्यटनासाठी आलेला 21 वर्षीय तरुण इंद्रायणी नदीपात्रात कुंडमळा येथे बुडाला
-करन हंबीर असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव
-करन आणि त्याचे मित्र आज पुण्यातील येरवडा येथून मावळ मधील कुंडमळा येथे वर्षा विहारासाठी आले होते
-स्थानिक ग्रामस्थांकडून मृतदेह शोधण्यास यश
-कलम 144 चा आदेश भंग करून मोठया प्रमाणात पर्यटक आजही झाले होते कुंडमळा येथे दाखल
-तळेगाव एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल
रायगड : खोपोली, खालापूर, रसायनी, पेण, अलिबाग परिसरात मागील दोन तास मुसळधार पाऊस.
खोपोलीतील DC नगर मध्ये पाणि साचुन तुडुबं भरलाय एरीया.
पाताळगगां नदी धुतढी भरुन वाहत आहे.
रसायनी भागातील औद्योगिक क्षेत्रातील सर्व मुग्य रस्ते पाण्याखाली. पोलीस स्टेशन चा रोड ही पाण्याखाली.
रसायनी भागातील रिलायन्स सह अनेक कपंन्यांकडे जाणारे रस्ते पाण्याखाली.
अलिबाग मध्येही मुसळधार पाऊस. मुख्य रस्ते व पेट्रोल पंपात पाणि शिरल्याने वाहनांची ताराबंळ.
रायगड : मुबंई-पुणे राष्ट्रीय मार्गावर खोपोली ते पनवेल रोड पाण्याखाली
हायवेवर पाण्यातून वाहतूक सुरु, रविवार असल्याने मुबंईकडे परतीच्या मार्गावर पर्यटक
शेडुगं टोल नाका परिसरात पाण्यातून वाहतूक सुरु.
पनवेलमधील बाजरपेठेतील मुख्य रस्ते पाण्याने भरले.
कर्जतमधून वाहणारी उल्हास नदी दुथडी भरुन वाहत आहे.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील आपत्कालीन अधिकाऱ्यांसोबत घेतलेली बैठक संपली
हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचे असतील
आपत्तीबाबात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आढावा मांडताना मुंबई शहरात रेस्क्यू टीम स्पॉटवर ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
अतिधोकादायक इमारती, डोंगराळ भागातील रहिवाशांचे स्थलांतर लवकर करण्याचे आदेश
आपत्कालीन बैठकीत मुंबई महापालिका आयुक्त, पालिका अधिकारी, राज्याचे मुख्य सचिव, हवामान विभागाचे अधिकारी रेल्वे अधिकारी उपस्थित होते
कल्याण : डोंबिवलीत गेल्या एक तासापासून जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे काही सखल भागात पाणी साचले आहे. कल्याण पूर्वेतील आडीवली ढोकली, कल्याण पश्चिमेतील अत्रे रंगमंदिर परिसरात पाणी भरले आहे. डोंबिवली पूर्वेतील मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये पावसाचे पाणी साचल्याने पोलीस कर्मचारी अधिकारी या पाण्यात काम करत आहेत . पाऊस असाच पडत राहिला तर सखल भाग जलमय होणार आहे.
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात गेल्या तासभरापासून मुसळधार पाऊस
कुडाळमध्ये जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात साचले पाणी
तर माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीला आला पूर
आंबेरी पुलावर आले गुडघाभर पाणी, वाहतूक ठप्प
माणगावमधील 27 गावांचा तालुक्याशी संपर्क तूटला
अजूनही पावसाची रिपरिप सुरूच
पुढचे 24 तास अतिवृष्टीचे
मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधदुर्ग जिल्ह्यात रेड अलर्ट जारी
मुंबई : मुंबईमध्ये झालेला मुसळधार पाऊस आणि त्यामुळे रेल्वे सेवा ठप्प झाल्याच्या परिस्थीवर रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच मोठं वक्तव्य
सध्याच्या परिस्थितीवर आम्ही नजर ठेवून आहोत
अधरिकाऱ्यांसोबत सीएसटी ते कल्याण पर्यंत प्रवास करणार
पाणी साचत असलेले पॉईंट आयडेंटिफाय केले असतील तर केंद्र सरकार त्याची व्यवस्था करेल
महापालिकेच्या हद्दीतल पाणी रेलवेच्या हद्दीत येत असेल तर त्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे त्यांनी त्याचा बंदोबस्त केला पाहिजे
आदित्य ठाकरेंनी दिली दुर्घटनाग्रस्त तीन ठिकाणांना भेट
बूर, विक्रोळी, भांडुप येथे दिली भेट
भूस्खलन झालेल्या तीन ठिकाणांना मी भेट दिली- चेंबूर, विक्रोळी, भांडुप येथे पावसाचे पाणी, माती आणि गाळ संरक्षक भिंत भेदून आतमध्ये शिरले. या ठिकाणी मदतकार्य चालू असून आवश्यक ती आर्थिक व वैद्यकीय मदत BMC व महाराष्ट्र सरकार द्वारे पुरवली जात आहे. pic.twitter.com/QfepJwqKEX
— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 18, 2021
नालासोपारा: नालासोपाऱ्यात गटाराच्या उघड्या चेंबरमध्ये पडून 4 वर्षांचा मुलगा गेला वाहून
अमोल सिंग असे वाहून गेलेल्या मुलाचे नाव आहे
वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवणाकडून मुलाचा शोध सुरू
नालासोपारा पूर्व बिलालपाडा तलाव जवळील मोठ्या नाल्यात आज सकाळी दहा ते साडे दहाच्या सुमारास घडली घटना
मनमाड : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे गाड्या करण्यात आल्या रद्द
मुंबई वरून सुटणाऱ्या 9 प्रवासी रेल्वे गाड्या करण्यात आल्या रद्द
मुंबई विभागामध्ये जोरदार अतिवृष्टीमुळे रेल्वे प्रशासनाद्वारे काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्या पुढील
प्रमाणे
02188 मुंबई जबल्पुर गरिब रथ विशेष यात्रा आरंभ दिनांक 18.07.2021 ला रद्द
02811 लोकमान्य टिळक टर्मिनस हटिया विशेष यात्रा आरंभ दिनांक 19.07.2021 ला रद्द
02169 मुंबई नागपूर विशेष विशेष यात्रा आरंभ दिनांक 18.07.2021 ला रद्द
01141 मुंबई आदिलाबाद विशेष यात्रा आरंभ दिनांक 18.07.2021 ला रद्द
02105 मुंबई गोंदिया विशेष यात्रा आरंभ दिनांक 18.07.2021 ला रद्द
02109 मुंबई मनमाड विशेष यात्रा आरंभ दिनांक
19 .07.2021 ला रद्द गाड्या
07057 मुंबई सिकंदराबाद विशेष यात्रा आरंभ दिनांक 18.07.2021 ला रद्द
02111 मुंबई अमरावती विशेष यात्रा आरंभ दिनांक 18.07.2021 ला रद्द
07612 मुंबई नांदेड राज्यराणी विशेष यात्रा आरंभ दिनांक 18.07.2021 ला रद्द
कृपया प्रवाशांनी याची नोंद घ्यावी
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची 6 वाजता महत्त्वाची बैठक
पावसामुळे उद्भवलेल्या आपत्तीचा घेणार आढावा
नालासोपारा : नालासोपारा पूर्वमध्यो धणीवबाग श्रीधर नगरमध्ये चाळीतील 3 रुमच्या भिंती कोसळल्याची घटना घडली आहे.
मध्यरात्रीच्या पावसाने या रूमच्या भिंती कोसळल्या आहेत. घरातील नागरिक तत्काळ घराबाहेर पडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घरातील संसार, सामान हे सर्व वाहून गेले आहे.
स्थानिक नगरसेवक पंकज पाटील यांनी दुर्घटनाग्रस्त भागाची भेट घेऊन त्यांना तातडीची मदत करत तेथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.
नवी मुंबई : शहरात शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे एका ठिकाणी भिंत कोसळली. तर नऊ ठिकाणी सखल भागात पाणी साचले. नवी मुंबई शहरात सरासरी दोनशे मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
नवी मुंबईत शनिवारी रात्री नऊ वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली. पहाटे सहा वाजेपर्यंत पाऊस सुरू होता. शहरात एका ठिकाणी भिंत कोसळली. यामध्ये कुणीही जखमी झाले नसल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली. तसेच पाच ठिकाणी झाडे कोसळली. तर नऊ ठिकाणी सखल भागात पाणी साचले. एक शॉर्टसर्किट तर एक गॅस लिकेजची घटना घडली. शहरात 200.88 मिमी पावसाची 12 तासांत नोंद झाली आहे. एकूण 1455.44 मिमी पावसाची नोंद झाली.
पुणे – पुण्यात रिमझिम पावसाला सुरुवात
– मोठ्या विश्रांतीनंतर पावसाचे आगमन
– शहरासह धरण क्षेत्रातही पाऊस सुरु
– सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण
– उकाड्यापासून हैरान असलेलेल्या पुणेकरांना दिलासा
वसई : वसईच्या मधूबन परिसरात पडलेल्या पावसाने अक्षरश: दैना उडवली आहे. शेकडो कार, मोटारसायकल पाण्यात बुडून खराब झाल्या आहेत. तर एक महिंद्रा कंपनीची xuv500 ही कार पुराच्या पाण्यात वाहून एका किनाऱ्यावर अडकली आहे. दुपारी 1 च्या पाणी ओसरायला सुरवात झाल्याने गाड्यांची झालेली दयनीय अवस्था समोर येत आहे. मधूबन परिसरात अक्षरशा समुद्र निर्माण झाला की काय अशीच अवस्था निर्माण झाली आहे.
मुंबई पोलीस, महापालिका, अग्निशमन दल, एनडीआरएफचे जवान यांनी लोकांना सेस्क्यू करण्यासाठी मोठी मेहनत घेतली. वरील सर्व दल रात्रीपासून ही मेहनत घेत आहेत. मिनी पंपांव्यतिक्त इतर पंपिग स्टेशन्सनी आतापर्यंत 4423.50 दशलक्ष लिटर पाणी उपसले आहे, अशी माहिती पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.
All through the night, teams from @mybmc , @MumbaiPolice , Mumbai Fire Brigade & NDRF worked to evacuate and rescue people from incidents like Mithi breaching danger levels.
Apart from mini pumps, our pumping stations pumped out 4423.50 million litres of water. pic.twitter.com/sPlCww7XRJ— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 18, 2021
मुंबई : विक्रोळी आणि चेंबूरमध्ये संरक्षक भिंत कोसळल्यानंतर अनेक आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. “नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेची चौकशी तर होणारच आहे. राज्य सरकारने मदत केलीय आहे. दुर्घटनेच्या घटनेचे राजकारण करणाऱ्यांना मला सांगायचं आहे की गंगेचं काय झालं ? राजकारण करायची ही वेळ नाही,” असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप म्हणाले.
मुंबई : विक्रोळी संरक्षण भिंत दुर्घटनेत आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झालय. एका रहिवाशांचा शोध अग्निशामक दल घेत आहे. यावर विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या संरक्षण भिंतीचे काम निकृष्ट दर्जाचं होतं त्यामुळे ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेची चौकशी झाली पाहिजे. कंत्राटदार महापालिका अधिकारी यांच्या संगनमतानं निकृष्ट दर्जाच काम करण्यात आल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
मुंबईच्या चेंबूर आणि विक्रोळी भागामध्ये झालेल्या दुर्घटनांमुळे आत्तापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे. या दुर्घटनांमधील मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निधीमधून 2 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यासोबतच, या दुर्घटनांमध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई : मुंबईत मध्यरात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे चेंबूर आणि विक्रोळी येथे झालेल्या दुर्घटनेत झालेल्या मृत्यूसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला. मृतांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर मोफत उपचार केले जातील, असं त्यांनी जाहीर केलं.
मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या जोरदार सरी बरसतील, असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर, पुढील तीन ते चार तासात काही ठिकाणी ढगांचा कडकडाट, वीज कोसळणे आणि जोरदार वारे वाहू शकतात, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
मुंबई, पालघर,डहाणूसाठी पुढील 24 तास महत्वाचे आहे. हवामान विभागाकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.
अर्ध्या-एक तासाच्या विश्रांतीनंतर मुंबईत पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. आकाशामध्ये ढगांनी दाटी केलीय. आज दिवसभर मुंबईत अशाच पद्धतीने पाऊस बरसण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय.
वाशीनाका-चेंबूरमध्ये पावसाचं रौद्ररुप, घरांवर संरक्षक भिंत कोसळून 10 जणांचा मृत्यू, 6 ते 8 जण अडकल्याची भीती…
एनडीआरएफ पोहोचण्यापूर्वी स्थानिक बीएमसी/अग्निशमन दलाच्या जवानांनी 10 मृतदेह बाहेर काढले आहेत. 6 ते 8 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एनडीआरएफची टीम घटनास्थळी आहे आणि शोधकार्य आणि बचावकार्य सुरू आहे…
Maharashtra | 11 people killed after a wall collapse on some shanties in Chembur’s Bharat Nagar area due to a landslide, says National Disaster Response Force (NDRF)
Rescue operation is underway. pic.twitter.com/W24NJFWThU
— ANI (@ANI) July 18, 2021
विक्रोळीच्या पंचशील नगर विभागात तीन ते चार घरे कोसळली, 3 जणांचा मृत्यू आणखी सात ते आठ लोक अडकले असून बचाव कार्य सुरू आहे
पाठीमागच्या पाच तासांपासून मुसळधार पाऊस
सायन रेल्वे स्टेशनचा ट्रॅक पूर्णपणे पाण्याखाली
ट्रॅकवर इतकं पाणी साचलंय की तो ट्रॅक आता नदीसारखा भासू लागला आहे.
पाऊसच एवढा धो धो कोसळतोय की अंधेरी पश्चिम सबवे परिसरात अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं. अनेकांना तशाच अवस्थेत रात्र काढावी लागली.