मुंबई: मुंबईसह राज्यातील (Mumbai Rain) विविध जिल्ह्यात आजही अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) हजेरी लावण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के. ए. होसाळीकर यांनी राज्यात पुढील तीन ते चार तासात काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता असल्याची माहिती दिली आहे.रायगड, ठाणे, मुंबई, रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि नाशिकमध्ये पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागानं मुंबईला यलो अॅलर्ट (Mumbai Yellow Alert) दिला असून कोकण, उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
WEATHER INFO-
Nowcast warning issued at 0700 Hrs IST dated 02/12/2021 :
Moderate spells of rain very likely to occur at isolated places in the districts of Raigad,Thane,Mumbai, Ratnagiri,Sindhudurg,Kolhapur,Pune,Nasik during next 3-4 hours.-IMD MUMBAI
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) December 2, 2021
डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सुरु झालेल्या अवकाळी पावसामुळं मुंबईत नव्या दोन गोष्टींची नोंद झाली आहे. मुंबईतील तापमान 9 अंशानं घटून 33.3 वरुन 24.8 वर आलं आहे. तर, मुंबईत डिसेंबरमधील 24 तासातील सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाच्या पावसाची नोंद देखील झाली आहे. बुधवारी बारा तासात सांताक्रुझ येथील पर्जन्यमापकात 41.6 मिमी पावसाची नोंद झाली. तर, कुलाबा येथील पर्जन्यमापकात 43.2 मिमी पावसाची नोंद झाली.
राज्यात पुढील 24 तासात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्यान हवामान विभागानं मच्छीमारांनी समुद्रात मासेमारी करण्यासाठी जाऊ नये, असा इशारा प्रादेशिक हवामान केंद्राच्या अधिकारी शुभांगी भुते यांनी दिला आहे. अरबी समुद्रात वेगवान वारे सुटले असून त्याचा वेग वाढत असल्यानं मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असं सांगण्यात आलं आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर होत आहे. मुंबई मध्ये पहाटेच्या वेळी हळूहळू पाऊस अनेक ठिकाणी सुरु होता. हवामान खात्याने मुंबई मध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि मालदीव लक्ष्यदिवच्या परिसरात चक्रीवादळ मुळे पाऊस पडत आहे.
इतर बातम्या :
Param Bir Singh | परमबीर सिंग यांची गच्छंती अटळ, निलंबनाच्या फाईलवर मुख्यमंत्र्यांची सही?
Mumbai Rain Update IMD issue yellow alert temperature drops by 9 points