Mumbai Rains : मुंबईत गुरुवारी रेकॉर्डब्रेक पाऊस, डिसेंबरमधील सर्वाधिक पावसाची नोंद

| Updated on: Dec 03, 2021 | 11:45 AM

मुंबईत (Mumbai) गुरुवारी डिसेंबर महिन्यातील एका दिवसातील सर्वाधिक पावसाची (Highest Rain Fall in December) नोंद झाली आहे.

Mumbai Rains : मुंबईत गुरुवारी रेकॉर्डब्रेक पाऊस, डिसेंबरमधील सर्वाधिक पावसाची नोंद
Mumbai Rain
Follow us on

मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra Rain) डिसेंबर महिन्यातील पहिल्या दोन दिवशी अवकाळी पावसानं (Unseasonal Rain) जोरदार बॅटिंग केली. अवकाळी पावसामुळं शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे. मुंबईत (Mumbai) गुरुवारी डिसेंबर महिन्यातील एका दिवसातील सर्वाधिक पावसाची (Highest Rain Fall in December) नोंद झाली आहे. भारतीय हवामान विभागाच्या सांताक्रुझ येथील पर्जन्यमापकात 91 मिमी पावसाची नोंद झाली. तर, कुलाबा वेधशाळेतील पर्जन्यमापकामध्ये 90 मिमी पावसाची नोंद झाली. गुरुवारी (2 डिसेंबरला) मुंबईतील तापमान 24.8 डिग्री सेल्सिअस इतकं होतं.

डिसेंबर महिन्यातील एका दिवसातील सर्वाधिक पावसाची नोंद

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर होत आहे. मुंबईमध्ये पहाटेच्या वेळी हळूहळू पाऊस अनेक ठिकाणी सुरु होता. भारतीय हवामान विभागाच्या सांताक्रुझ येथील पर्जन्यमापकामध्ये 91.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यापूर्वीचा सर्वाधिक पाऊस 6 डिसेंबर 2017 ला मंबईत नोंदवला गोले होता. त्यावेळी मुंबईत 53.8 मिमी पाऊस 24 तासामध्ये पडला होता. दोन दिवसातील पावसानं डिसेंबर महिन्यातील  पावसाचं रेकॉर्ड देखील मोडलं आहे. 2017 मध्ये 75.8 मिमी पावसाची नोंद झाली होती.

बुधवारी देखील जोरदार पाऊस

मुंबईत 1 डिसेंबरला सांताक्रुझ येथील पर्जन्यमापकात 41.6 मिमी पावसाची नोंद झाली. तर, कुलाबा येथील पर्जन्यमापकात 43.2 मिमी पावसाची नोंद झाली होती. तर, तापमान देखील 9 अंशानी घटलं होतं.

अवकाळी पावसामागील कारण काय

महाराष्ट्रात सहसा नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये पाऊस होत नाही. अरबी समुद्रातील कमी दाबाचं क्षेत्र आणि चक्रीवादळाच्या स्थितीमुळं मुसळधार पाऊस झाला. हवामान विभागानं 1 आणि 2 डिसेंबरला राज्यात पाऊस होणार असल्याचा इशारा दिला होता.

मंबईतील तापमान आजही कमी राहणार

भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार डिसेंबरच्या पहिल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळं आजही मुंबईतील तापमान कमी राहणार आहे. मुंबईतील तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

इतर बातम्या :

Nashik| ग्रंथदिंडी निघाली वाजत गाजत, भुजबळांच्या हाती विणा; साहित्य संमेलन होणार अध्यक्षाविना!

Scholarship exam : पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख ठरली, MSEC ची मोठी घोषणा

Mumbai Rain Update IMD recorded highest rainfall in one day of December