मुंबई : मुंबईसह राज्यात सकाळपासून अवकाळी पावसाची रिपरिप सुरु आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या द्रोणीय क्षेत्राचा प्रभाव म्हणून राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्रासह विविध भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसाचा ग्रामीण भागाला मोठा फटका बसला असून शेतपिकं, फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे भाजीपाला आणि फळभाज्यांच्या पुरवठ्यावर परिणाम होऊन दरवाढीचे संकट उभे ठाकले आहे. राज्यात पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
राज्यात पुढचे 24 तास पावसाचा इशारा
उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार
अरबी समुद्रातील वदळी परिस्थितीमुळे पावसाचा इशारा
धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघर 24 तास आँरेज अलर्ट
कोकणातील आणि मध्य महाराष्ट्रतील जिल्ह्यांना एँलो अलर्ट
मच्छिमारांनी 24 तासात समुद्रात जाऊ नये
पुणे : पुण्यात पावसाचा जोर वाढला
सकाळी 7 वाजल्यापासून सुरु आहे पाऊस
पावसासोबत धुकंही मोठ्याप्रमाणात
पुढील तीन दिवस शहर आणि परिसरात मध्यम पावसाचा हवामान खात्याने दिलाय इशारा
वसई : सकाळपासून पडणाऱ्या पावसाने मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वसई हद्दीत मालजीपाडा येथे पाणी साचले आहे.
साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना महामार्गावरील मुंबई लेनवर 1 किलोमीटरपर्यंत वाहतूक जाम झाली असून धीम्या गतीने सुरू आहे.
मालजीपाडा परिसरात महामार्गावरील मुख्य रस्त्यावर सकल भाग असून डोंगराचे पाणी रस्त्यावर येऊन साचत आहे. याचा फटका वाहनधाराकांना बसत आहे.
IRB ने यावर तत्काळ तोडगा काडून पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग काढावा अशी मागणी आता होत आहे.
मुंबई
आज उत्तर कोकण आणि उत्तर मध्यमहाराष्ट्राच्या काही भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता
उद्या पासून महाराष्ट्रात पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता
येत्या 5दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा
मुंबई
अवकाळी पावसामुळे मुंबईकराचीही दाणदाण उडाल्याचं चित्र आहे
वरळीच्या मुख्य रस्त्यावरं पाणी साचल्याचं पाहिला मिळत
वरळीहून हाजीआली , महालक्ष्मी कडे जाणार्या रस्त्यावर वाहनांना साचलेल्या पाण्यातून वाट काढवी लागत आहे
अचानक पडलेला पावसानं मु़ंबईकरांनाही चांगलीचं कसरत करावी लागतेय
पुणे
पुण्यात हरवलं धुकं,
पुण्यातल्या टेकडीवरून दिसतं नयनरम्य दृश्य
सकाळपासूनचं पुण्यावर धूक्याची चादर,
महाबळेश्वर नाही हे पुणे आहे !
जळगाव
जळगाव – शहरात पहाटेपासून ढगाळ वातावरण
शहराच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी
बदलत्या ऋतुचक्राचा शेतकऱ्यांना बसणार फटका
रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळपासून रिमझिम पावसाच्या सरी पडतायत. हवामान खात्यानं अरबी समुद्रात कमीदाबाचा पट्टी निर्माण झाल्याने पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली होती. ती शक्यता खरी होताना पहायला मिळतेय. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी पहायला मिळतायत. पावसाच्या हलक्या सरी आहे. पुढचे तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे.
रायगड
जिल्ह्यात अवकाळी पाऊस
रोह, खोपोली, कर्जत, अलिबाग, माणगाव सह अनेक भागात पावसाची रिमझिम
सर्वत्र ढगाळ वातावरण
हवामान खात्याने दिला आहे इशारा.
पिंपरी चिंचवड
-पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागात आज सकाळी रिमझिम पावसाला सुरुवात झालीय
-सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण होते
-साडे आठ च्या सुमाराला शहरात काही भागात तुरळक सरी बरसल्या त्यानंतर मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस शहरात बरसला
कल्याण डोंबिवलीमध्ये रिम झिम पाऊस
कल्याण डोंबिवली मध्ये सकाळ पासून ढगाळ वातावरण होत .अर्ध्यातासापासून कल्याण डोंबिवलीत अवकाळी रिम झिम पावसाने हजेरी लावली आहे .त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांची एकच तारांबळ उडल्याचे दिसून आले.
नाशिकमध्ये ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकाला फटका
अरबी समुद्रात कमी दाबाचा पाटानिर्माण झाल्यामुळे नाशिक जिल्ह्यासह राज्यात तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तविल्यामुळे कांदा पिकाला फटका बसून नये म्हणून महागडी औषधे फवारण्याची वेळ येवला तालुक्यातील कांदा उत्पादकांवर आल्याचे चित्र दिसते
वसई विरार मध्ये रिमझिम पाऊस सुरू
मुंबई उपनगरात रिमझिम पाऊस
बोरीवली, कांदिवली, मालाड, गोरेगावसह अंधेरी वांद्रे परिसरात आज सकाळपासूनच सूर्यकिरणे दिसली नाहीत, या भागात काळ्या ढगांसह हलका पाऊस सुरू आहे, तर दुसरीकडे मुंबईकरांची उन्हापासून सुटका झाली आहे, आणि आता थंडी जाणवणे.