मुंबई : मुंबई आणि उपनगरात मुसळधार (Mumbai Rains) पावसाने सकाळपासून हजेरी लावली आहे. मुंबईसोबत आजूबाजूच्या परिसरात पावसाचा जोर वाढलाय. मुंबई, नवी मुंबई (Navi Mumbai), ठाणे, पालघर, पनवेल इत्यादी भागात मुसळधार पावसाची बॅटिंग सुरु सकाळपासून पाहायला मिळाली आहे. दिवसभर पावसाचा जोर असाच कायम राहण्याची शक्यता (Maharashtra Rain alert) वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, पावसाचा जोर असात राहिला, तर सखल भागात पाणी भरुन मुंबईची पुन्हा तुंबई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पालिका प्रशासनही सज्ज झालंय. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबई आणि उपनगरासह ठाणे, रायगड या भागात पावसाचा जोर वाढलाय.
मुसळधार पावसाचा परिणाम मुंबईच्या वेगावर होण्यास सुरुवात झाली आहेत. मुंबईच्या तिन्ही लोकल मार्गावरची सेवा उशिराने सुरु आहे. तर रस्त्यांवर सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे वाहतुकीचा वेगही मंदावू लागलाय.
#MumbaiRains #Mumbaikars, #Thanekars take care while commuting to office today. Possibility of mod to intense spells of rains next 3,4 hrs as seen frm latest radar obs at 9 am
Mumbai & around received mod to heavy rains in past 24 hrs.
Next 48 hrs, possibility of heavy rains pl pic.twitter.com/FftkGz3UXy— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 16, 2022
मुंबईमध्ये शुक्रवारी सकाळी 9 वाजल्यापासून पावसाचा जोर वाढला आहे. दरम्यान, येत्या 3 ते 4 तासांत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अपरिहार्य कारण नसेल, तर शक्यतो घराबाहेर न पडण्याचं आवाहनही जाणकारांकडून गेलं जातंय. शिवाय येत्या 48 तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाचे तज्त्र आणि जाणकार के.एस. होसाळीकर यांनी ट्वीट करुन याबाबतची माहिती दिली आहे.
खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रातला पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय. त्यामुळे पुण्यातील भिडे पुलावर पाणी येण्यास सुरुवात झालीय. त्यामुळे भिडे पुलावरची वाहतूक पोलिसांनी बंद केलीय.
नाशिकमध्ये पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावल्याने गोदा घाट परिसरात पाण्याची पातळी वाढली आहे. नाशिक जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पाऊस सुरूच आहे. जिल्ह्यातील 24 प्रकल्प तुडुंब भरलेत. पाहा व्हिडीओ…
फक्त मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातच नव्हे, तर पुणे आणि नाशिकमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे नाशिकच्या गंगापूर धरणातून पाणी सोडण्यात आलं आहे. गंगापूर धरणातून 7 हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तर इतके पुण्यातही पुन्हा एकदा जोरदार सरींनी हजेरी लावलीय.
ठाण्याच्या भिवंडी शहरात कोसळलेल्या मुसळधार पावसाने अनेक सखल भागात पावसाचे पाणी साचले.तर तीनबत्ती भाजी मार्केटमध्ये एक ते दीड फूट पाणी साचल्याचे पाहायला मिळाले.