शिवसेना ठाकरे गटाची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. 17 जागांवरच्या उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. 22 जागांवर शिवसेना ठाकरे गट निवडणूक लढण्यासाठी आग्रही आहे. त्यापैकी 17 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात काही विद्यामान खासदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे. तर काही नव्या चेहऱ्यांनाही संधी देण्यात आलेली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर जे सत्तेसोबत गेले नाहीत, त्या निष्ठावंतांनाही उमेदवारी देण्यात आलेली आहे.
1 बुलढाणा-नरेंद्र खेडेकर
2. यवतमाळ- संजय देशमुख
3. मावळ – संजोग वाघेरे- पाटील
4. सांगली -चंद्रहार पाटील
5. हिंगोली- नागेश अष्टीकर
6. छत्रपती संभाजीनगर- चंद्रकांत खैरे
7. धाराशीव- ओमराजे निंबाळकर
8. शिर्डी- भाऊसाहेब वाघचौरे
9. नाशिक- राजाभाऊ वाझे
10. रायगड – अनंत गिते
11. रत्नागिरी- सिंधुदुर्ग – विनायक राऊत
12. ठाणे- राजन विचारे
13. मुंबई- ईशान्य – संजय दीना पाटील
14. मुंबई- दक्षिण- अरविंद सावंत
15. मुंबई- वायव्य अमोल किर्तिकर
16. मुंबई दक्षिण मध्य- अनिल देसाई
17. परभणी- संजय जाधव
संजय राऊत यांनी ठाकरे गटाच्या 16 उमेदवारांची पहिली यादी ट्विट केली आहे. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे. मुंबई दक्षिण मध्य-श्री अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येत आहे. इतर 16 उमेदवार पुढील प्रमाणे…, असं ट्विट करत संजय राऊतांनी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे..
*मुंबई दक्षिण मध्य:श्री अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येत आहे.
इतर 16 उमेदवार… pic.twitter.com/nPg2RHimSF— Sanjay Raut (@rautsanjay61) March 27, 2024
ओमराजे निंबाळकर, विनायक राऊत, अरविंद सावंत, विनायक राऊत, राजन विचारे, संजय जाधव या विद्यमान खासदारांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई वायव्य या मुंबईतील दोन जागांवरही काँग्रेसने दावा केला होता. पण तिथेही अमोल किर्तीकर आणि अनिल देसाई यांची उमेदवारी जाहीर करत या दोन जागा ठाकरे गटाने आपल्याकडे घेतल्या आहेत.