सुनिल जाधव, डोंबिवली, दि.24 डिसेंबर | मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांत फेरीवाल्यांची दादागिरी सुरु असते. फुटपाथ व्यापलेल्या या फेरीवाल्यांवर महानगरपालिका कारवाई करत नाही किंवा पोलिसांकडूनही काही होत नाही. यामुळे सर्वसामान्यांना फुटपाथवरुन चालणे अवघड होत असते. तसेच किरकोळ कारणावरुन मारहाणीच्या अनेक घटना घडत असतात. डोंबिवलीत पुन्हा फेरीवाल्यांची दादागिरी समोर आली आहे. एका आयटी इंजिनिअर तरुणाने डोंबिवली स्टेशन स्कायवॉकवर फेरीवाल्याचा धक्का लागला. यामुळे फेरीवाल्याला जाब विचारला. या गोष्टीचा राग मनात धरुन चार ते पाच फेरीवाल्यांनी मिळून त्या तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तरुणाने डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
डोंबिवली पूर्वे श्रीखंडेवाडी परिसरात सुधीर पगारे हा तरुण त्याच्या कुटुंबासह राहतो. तो काही कामानिमित्त डोंबिवली स्टेशन मधूबंद टॉकीज परिसरात गेला होता. त्याठिकाणाहून जात असताना एका फेरीवाल्याचा धक्का लागला. सुधीर याने त्याला जाब विचारला. या जाब विचारल्याच्या रागात चार ते पाच फेरीवाल्यांनी सुधीर याला पकडून त्याला मारहाण केली. काही प्रवाशांनी मध्यस्थी करून सुधीर पगारे याला सोडवले. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. या नंतर सुधीर पगार याने पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
नव्या केडीएमसी आयुक्त यांनी फेरीवाला आणि रस्त्यांसंदर्भात स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त मिळेल, अशी आश्वासन दिले होते. मात्र या घटनेने या मनपाची पोलखोल केली आहे. सर्वसामान्य व्यक्ती कर भरतो, परंतु त्याच्या शहरातील फूटपाथ त्याला वापरता येत नाही. फूटपाथवरुन चालता येत नाही. कारण फूटपाथवर फेरीवाले बसतात. मला त्याचा फायदा काय. महापालिका काय करते. असा संतप्त सवाल या पीडित तरुणाने पालिकेला करला आहे.
रामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक नितीन गीते सांगितले की, या प्रकरणात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. मारहाण करणाऱ्या फेरीवाल्यांचा शोध सुरु आहे. केडीएमसीच्या नव्या आयुक्त डॉक्टर इंदूराणी जाखड यानी स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करण्यासाठी शहराला वा’केबल सिटी करण्यासाठी जे काही करता येईल. ते आम्ही करणार असा दावा केला होता. परंतु त्यांच्या या दाव्याची फोलखोल झाली आहे. फेरीवाल्यांसमोर महापालिका प्रशासन हतबल झाले आहे. राजकीय पक्षांनी देखील आपली तलवार म्यान केली आहे.