मुंबई – रेल्वेकडून नवीन मार्गिका सुरू करण्यासाठी आणि काही पायाभुत सुविधांचे काम करण्यासाठी रेल्वे विभागाकडून मेगा ब्लॉक (mega block) घेण्यात आला आहे. येत्या 8 फेब्रुवारीला तुमच्या प्रवासाठी नवीन मार्गिका येणार आहे. ती ठाणे-दिवा (thane diva)दरम्यान दहावी मार्गिका असणार असून त्यामुळे मुंबईकरांचा आणि ठाणेकरांचा प्रवास सुकर होणार आहे. त्यासाठी 4 फेब्रुवारी म्हणजे आज रात्री 12 वाजल्यापासून ते 7 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपर्यंत मेगा ब्लॉक असेल असे रेल्वे प्रशासनाकडून (Railway Administration) सांगण्यात आलं आहे. या ब्लॉकमुळं अनेकांना बस प्रवास करावा लागणार आहे. विशेष म्हणजे या ब्लॉकमुळं 350 लोकल रद्द करण्यात येणार आहेत. तसेच 117 लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे काही गाड्यांचा प्रवास पवनेल पर्यंत असेल. आज रात्री लोकमान्य टिळक टर्मिनसवरून निघणा-या आणि ठाण्या दरम्यान पोहचणा-या लांबपल्ल्याच्या गाड्या 7 फेब्रुवारीपर्यंत कल्याण स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावर ठाणे प्लॅटफॉर्म क्रमांक 5 या मार्गावर वळवण्यात येतील. नवीन मार्गिका तयार करण्यासाठी इतर पायाभूत कामे करण्यासाठी 72 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे.
नवं वेळापत्रक
मेगा ब्लॉक सुरू झाल्यानंतर (4 फेब्रुवारी) रात्री 11. 10 नंतर पुढचं काम होईपर्यंत कल्याण स्थानकातून सुटणा-या लाबंपल्ल्याच्या गाड्या आणि लोकल कल्याण आणि मुलुंड दरम्यान धिम्या मार्गाकडे वळवल्या जातील. विशेष म्हणजे या गाड्या ठाणे स्थानकात थांबवल्या जाणार नाहीत. 6 फेब्रुवारीनंतर येणा-या जलद गाड्या आणि कळवा टफॉर्म क्रमांक चार आणि नवीन बोगद्याच्या एका मार्गाने चालवण्यात येतील.
72 तासांचा मेगा ब्लॉक
प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून ठाणे महानगरपालिकेकडून आणि कल्याण महानगरपालिकेकडून अधिक बस चालवण्यात येतील, कारण हा खूप मोठा मेगा ब्लॉक असल्याने लोकांचे हाल होऊ नये याची काळजी पालिकेकडून घेतली जाईल. विशेष म्हणजे हा 72 तासांचा मेगा ब्लॉक असल्याने अनेक प्रवाशांना त्रास होण्याची शक्यता आहे.