मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळतीय. आजही मुंबईत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. तर कोकणातही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. पावसामुळे अनेक भागांत पाणी साचतंय. नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. तर रेल्वेसेवेवर देखील पावसाचा परिणाम होतोय. आज सकाळपासून मुंबईत पावसाची संततधार सुरु आहे, वाहतूक सेवेवर आणि मुंबई लोकलवर त्याचा कसा परिणाम झालाय ते आपण पाहूया…
विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडूप या स्टेशनवर रेल्वे रुळावर पहाटे पाणी साचलं होतं. त्यामुळे 20 मिनिटं मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली होती. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वे रुळावरील पाण्याचा तातडीने उपसा केला आहे. त्यानंतर वाहतूक सुरू करण्यात आली. फक्त मध्य रेल्वे 20 मिनिटे उशिराने धावत आहे. हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे, अशी माहिती मध्य रेल्वेची जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.
Due to heavy rainfall and waterlogging in Vikroli-Kanjurmarg section, traffic have been stopped temporarily.
The trains on Main line are running b/w Thane – Kalyan Kalyan-Karjat-Khopoli, Kasara,
Harbor line , Trans-Harbor line, Belapur/Nerul- Kharkopar line trains are running.
— Shivaji M Sutar (@ShivajiIRTS) July 19, 2021
महापे पुलाखाली पाणी साचल्याने या मार्गावर वाहतूक कोंडी, टिटवाळा कल्याण रस्त्यावरील बल्याणी रस्ता वाहतुकीसाठी बंद
नवी मुंबई ऐरोली मार्गावर महापे पुलाखाली पाणी साचल्याने या मार्गावर वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. कालपासून कल्याण-डोंबिवलीत जोरदार पाऊस सुरू आहे. सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचलेला सुरुवात झाली आहे. रात्री जोरदार पावसामुळे टिटवाळा कल्याण या मुख्य रस्त्यावर बल्याणी येथे रस्त्याचा काही भाग खचल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे.
सखल भागांत पाणी साचल्याने वाहतूक कोंडी
मुंबईत जोरदार पाऊस सुरू असल्याने मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. अनेक झोपडपट्ट्या आणि सोसायट्यांमध्येही पाणी साचलं आहे. मुंबईतील सखल भागातील रस्ते पाण्याखाली गेल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली आहे.
गोवा-कोकण रेल्वे मार्गावर थिविम ते करमळी रेल्वे स्थानका दरम्यान दरड कोसल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झालेली आहे. कोकण रेल्वे स्थानकावर अनेक रेल्वे गाड्यांचा खोळंबा झालेला पाहायला मिळतोय. पहाटे ४ वाजल्यापासून कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झालेला आहे. वडवली ते दिघी रस्तावर कुडगाव हद्दीत रस्त्यावर दरड कोसळली आहे. दरड हटवण्याचे काम सुरू आहे. पर्यायी मार्गाने ( नानवली मार्गे) वाहतूक सुरू आहे.
माणगाव- म्हसळा मार्गावर मोरबा च्या पुढे माणगाव तालुका हद्दीत रस्त्यावर दरड कोसळली आहे.सध्या दरड हटविण्याचे काम सुरू आहे. पर्यायी मार्गाने (मांजरवणे) वाहतूक सुरू आहे.
(Mumbai Traffic and Train Update Mumbai Konkan Rain)
हे ही वाचा :
VIDEO | मुंबई महापालिकेच्या पे अँड पार्कमध्ये 20 फूट पाणी, 400 वाहनं बुडाल्याची भीती
Mumbai Rains: मुंबईत पावसाचा कहर सुरूच, मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत; चाकरमानी वैतागले