मुंबई : महिलेने मारहाण केल्यानंतरही संयम बाळगणारे वाहतूक पोलिस हवालदार एकनाथ श्रीरंग पार्टे यांना ‘संयमाची बक्षिसी’ मिळाली. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते पार्टेंसह त्यांच्या पत्नीचाही सत्कार करण्यात आला. पोलिस असो किंवा मुंबई महापालिकेचे कर्मचारी, त्यांच्यावर हल्ले होणे योग्य नाही, असे सांगत गृहमंत्र्यांनी कारवाईचा इशारा दिला. (Mumbai Traffic Police Head Constable Eknath Parte beaten up by lady felicitated by HM Anil Deshmukh for keeping patience)
“मुंबई पोलीस दलातील वाहतूक शाखेचे हवालदार एकनाथ पार्टे यांना कर्तव्यावर असताना मारहाण झाली. ही बाब निषेधार्ह आहे. पार्टे यांनी संयम व धैर्याने परिस्थिती हाताळली. त्याबद्दल पार्टे यांचा सत्कार केला. पोलीसही माणूस असतो, त्यांच्या भावनांचा सन्मान करा” असे आवाहन देशमुखांनी नागरिकांना केले.
.@MumbaiPolice दलातील वाहतूक शाखेचे हवालदार एकनाथ पार्टे यांना कर्तव्यावर असताना मारहाण झाली, ही बाब निषेधार्ह आहे. पार्टे यांनी संयम व धैर्याने परिस्थिती हाताळली. त्याबद्दल पार्टे यांचा सत्कार केला. पोलीसही माणूस असतो, त्यांच्या भावनांचा सन्मान करा असे मी नागरिकांना आवाहन करतो. pic.twitter.com/hg75HbFk23
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) October 30, 2020
काय आहे प्रकरण?
मुंबईतील काळबादेवी परिसरात वाहतुकीचे नियम मोडल्याने कारवाई करत असताना हवालदार एकनाथ पार्टे यांना सादविका तिवारी नावाच्या महिलेने बेदम चोप दिला होता. पार्टे यांनी आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा दावा तिने केला होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओत सादविका ही पार्टे यांची कॉलर पकडत मारहाण करत असल्याचे आणि त्यांचे कपडे फाडत असल्याचे दिसले होते. मात्र पार्टे यांनी संयम राखत अजिबात प्रत्युत्तर केले नाही. यानंतर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात आला होता.
त्यानंतर, “या बाईवर तात्काळ कारवाई करायलाच हवी, हा मुंबई पोलिसांच्या सन्मानाचा विषय आहे” अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली होती. एकनाथ पार्टे यांच्यावर हात उचलणारी महिला सादविका तिवारी आणि तिचा साथीदार मोहसीन खान या दोघांनाही अटक करण्यात आली.
याआधी, मुंबई पोलीस आयुक्तांकडूनही पार्टे यांचा सहपरिवार सत्कार करण्यात आला होता. परमबीर सिंह यांनी 10 हजार रुपये आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार केला होता. तर कुलाबा विभागाच्या एसीपी लता दोंदे यांनी घटनास्थळी पार्टे यांचा गौरव केला होता.
A video went viral on social media of a woman physically assaulting HC Eknath Parte.
A case has been filed against 2 accused & as a gesture of solidarity towards police personnel working 24/7 across Mumbai, HC Parte was felicitated at the site of the incident.#RespectForAll pic.twitter.com/4QW6SpVSi7(Mumbai Traffic Police Head Constable Eknath Parte beaten up by lady felicitated by HM Anil Deshmukh for keeping patience)
— Mumbai Police (@MumbaiPolice) October 29, 2020
शिवसेना दक्षिण मुंबई विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी कॉन्स्टेबल एकनाथ पार्टे यांचा सत्कार केला होता.
वाहतूक पोलिस कॉन्स्टेबल एकनाथ पार्टे यांनी आपला संयम राखून परिस्थिती नीट सांभाळली. शिवसेना दक्षिण मुंबई विभाग प्रमुख श्री. पांडुरंग सकपाळ यांनी कॉन्स्टेबल एकनाथ पार्टे यांचा सत्कार केला आणि संयम राखून परिस्थिती नीट सांभाळली म्हणून त्यांचे कौतुक केले.@OfficeofUT @AUThackeray https://t.co/1VAA5xqV7D pic.twitter.com/BZPiEj5Cvu
— Pandurang Sakpal (@PandurangSakpal) October 25, 2020
संबंधित बातम्या :
VIDEO : ‘या’ बाईवर तात्काळ कारवाई करा, मुंबई पोलिसांच्या सन्मानाचा विषय, संजय राऊतांची मागणी
(Mumbai Traffic Police Head Constable Eknath Parte beaten up by lady felicitated by HM Anil Deshmukh for keeping patience)