मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे निर्बंध पाळून नववर्षाचे स्वागत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून पार्ट्यांवर बंदी घालण्यात आलीय. मुंबईमध्ये तर गर्दी टाळण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. नववर्षानिमित्त पोलिसांकडून नाकांबदी करण्यात आली आहे. तसेच मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्ग, दिंडोशी परिसरात वाहतूक पोलिसांकडू नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. तर प्रशासनाने केलेल्या आवाहनाला लोकांकडून प्रतिसाद मिळत असून ड्रिंक अँड ड्राईव्हचे एकही प्रकरण दिंडोशी परिसरात सापडलेले नाही.
नव्या वर्षाचे स्वागत करताना अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून नाकाबंदी सुरु आहे. मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्ग, दिंडोशी परिसरात वाहतूक पोलीस विशेष सतर्क दिसले. येथे सीट बेल्ट आणि हेल्मेट नसलेल्या अनेकांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र आनंदाची बाब म्हणजे नव्या वर्षाच्या स्वागतादरम्यान या भागात ड्रिंक आणि ड्राईव्हचे एकही प्रकरण आढळले नाही. पोलिसांनी तशी माहिती दिली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी मुंबई पश्चिम द्रुतगती महामार्गावर लोकांना ड्रिंक अँड ड्राईव्ह आणि सुरक्षेबाबत जागरुक केले.
मुंबई तसे उपनगरात नववर्षानिमित्त चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांनी पश्चिम उपनगरात 35 ठिकाणी नाकाबंदी केली. त्याप्रमाणे वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या लोकांना पोलिसांच्या वतीने अनोखी भेटदेखील देण्यात आल्या. जे लोक वाहतुकीचे नियम मोडतील त्यांच्यावर कारवाईदेखील केली गेली.
मुंबईत पार्टी-सेलिब्रेशनला बंदी
दरम्यान, वाढत्या कोव्हिड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन पार्ट्यांना आधीच चाप लावण्यात आला. रेस्टॉरंट, हॉटेल, बार, पब, रिसॉर्ट, क्लब यासारख्या कुठल्याही खुल्या किंवा बंदिस्त जागी 30 डिसेंबर ते 7 जानेवारी या काळात न्यू इयर सेलिब्रेशनसाठी जमता येणार नाही. लोकांनी घरातच नवीन वर्षाचे स्वागत करावे, बाहेर पडू नये असे आवाहन महापालिकेने केले आहे.
इतर बातम्या :