महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?, उद्धव ठाकरे यांनी पत्ते उघडले?; मोठं विधान काय?

| Updated on: Jun 27, 2024 | 2:11 PM

Uddhav Thackeray on Maharashtra CM : आज सकाळी संजय राऊतांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत महत्वाचं विधान केलं. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी त्यावर भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरे काय म्हणाले? विधान परिषदेच्या निवडणुकीवर ते काय म्हणाले? वाचा सविस्तर...

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?, उद्धव ठाकरे यांनी पत्ते उघडले?; मोठं विधान काय?
महाविकास आघाडी
Follow us on

लोकसभेनंतर महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होणार आहे. महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असा हा सामना होणार आहे. अशातच महायुती आणि महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल? याची राज्यभरात चर्चा होत आहे. या सगळ्या घडामोडींदरम्यान ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना निवडणुकीआधी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करण्याची गरज असल्याचं म्हटलं. शिवाय अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांचं नाव उद्धव ठाकरे यांनी सुचवलं आहे. यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी महाविकास आघाडी आणि राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

महायुतीत अपयशाच्या धन्याचा चेहरा पुढे येऊ द्या. एकमेकांवर आरोप करत आहेत. आम्ही विकास आघाडीचा चेहरा योग्यवेळी बाहेर आणू. महाविकास आघाडीचा चेहरा महाराष्ट्र आहे. मी वर्धापन दिनाच्या भाषणात म्हणालो, वाजवले ना बारा आता जाऊ द्या ना घरी. त्यांच्या अपयशाचा चेहरा नक्की कोण. आमच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करू, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

१६ मते आहेत. ११ जागा आहेत. शिवसेनेचा एक उमेदवार येऊ शकतो. एनसीपीने नीट गणित मांडलं तर एक येऊ शकतो. काँग्रेसचा एक येऊ शकतो. शेकापचे एक एक येऊ शकतो. जयंत पाटील यांना एनसीपी तिकीट देत असेल तर त्यांचाही येईल. आमचं गणित पक्क आहे. ११ जागेत आमच्या तीन पक्षाच्या तीन येतात. आम्ही एकएकाची खात्री देत आहोत. त्यामुळे त्यांची मते त्यांना सांभाळायची आहे. कारण लोकसभा निवडणुकीनंतर बऱ्याच हालचाली झाल्या आहेत. विधानपरिषदेची निवडणूक झाली तर गंमतीशीर होणार. पेढे कोण कुणाला भरवतोय ते कळेल, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीवर भाष्य केलंय.

पोलीस भरती अन् तरूणांच्या रोजगारावर भाष्य

सध्या पोलीस भरती सुरू आहे. साडे सतरा हजार जागा आहेत. १७ लाखाहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले. त्यांना सोयी सुविधा दिल्या जात नाहीत. अनेक ठिकाणी ही मुलं ब्रिज आणि झाडाखाली झोपत आहेत. बेकारी वाढत आहे. त्यांना दिलासा द्या. डबल इंजिन सरकारने वाफा सोडल्या. गळती सरकारने केंद्राची मदत घेऊन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा. लाडकी बहिण योजनेचं स्वागत तसंच लाडका भाऊ ही योजनाही आणा. महिला कर्तुत्वान आहेत. त्यामुळे भेदभाव करू नका. अनेक घरात कर्ती महिला असते. दोघांसाठी ही योजना आणा, असं म्हणत पोलीस भरतीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.