100% लसीकरण झालेल्या इमारतींना बीएमसी देणार प्रमाणपत्र

| Updated on: Oct 17, 2021 | 6:12 PM

मुंबईत ज्या इमारतींच्या पात्र रहिवासींचे 100 % लसीकरण पूर्ण झाले आहे अश्या इमारतींना बीएमसी प्रमाणपत्र देणार आहे. "माझी सोसायटी जबाबदार  सोसायटी", "My Society Responsible Society" या योजने अंतर्गत हे केला जाणार आहे.

100% लसीकरण झालेल्या इमारतींना बीएमसी देणार प्रमाणपत्र
BMC Covid Certificate
Follow us on

मुंबई : (देवश्री भुजबळ) मुंबई महानगरपालिका मुंबईत मंदावलेल्या लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी वेगवेगळे उपाययोजना राबवायला सुरुवात करत आहे. त्या योजनेचा भाग म्हणून मुंबईत ज्या इमारतींच्या पात्र रहिवासींचे 100 % लसीकरण पूर्ण झाले आहे अशा इमारतींना बीएमसी प्रमाणपत्र देणार आहे. हे प्रमाणपत्र वॉर्ड आरोग्य अधिकाऱ्या मार्फत इमारतींच्या गेट वर किंवा इतर दर्शनी भागावर चिटकविण्यात येईल. “माझी सोसायटी जबाबदार  सोसायटी”, “My Society Responsible Society” या योजने अंतर्गत हे केला जाणार आहे. हे पत्रक मराठी आणि इंग्रजीत लावण्यात येईल.

 

सोसाट्यांनी वॉर्ड ऑफिस आरोग्य अधिकाऱ्याला माहिती द्यायची

बीएमसी आरोग्य विभागाने सर्व 24 वॉर्ड्सला प्रत्येक प्रभागातील इमारतींची लसीकरणाची माहिती गोळा करायला सांगितले आहे व वॉर्डच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी इमारतींना सर्व पात्र रहिवास्यांपैकी किती जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे याची माहिती मागवण्यास सुरुवात केलेली आहे. पुढच्या काही दिवसात जशी माहिती प्राप्त होत जाईल त्या इमारतींवर प्रमाणपत्र लावण्यात येईल. मात्र ज्या ठिकाणी गरज आहे तिथे जनजागृती केली जाईल, अशी माहिती बीएमसी आरोग्य विभाग्याच्या अधिकाऱ्याने दिली.

 

मुंबईत लसीकरण मंदावले

गेले काही दिवस मुंबईत लसीकरणाचा वेग मंदावलेला आहे व पुरेसा साठा उपलब्ध असूनही प्रतिदिन जवळपास 50% लसींचा साठा शिल्लक राहत आहेत. मुंबईत 16 जानेवारी 2021 पासून कोरोना लसीकरणाची सुरुवात झाली आणि 12 ऑक्टोबर 2021 पर्यंत जवळपास 1 कोटी 29 लाख लसींच्या मात्रा देण्यात आलेल्या आहेत. मिशन कवच कुंडल मोहिमेनुसार प्रतिदिन मुंबईत 1 लाख 50 हजार ते २ लाख लोकांचे लसीकरण होणे अपेक्षित आहे मात्र सध्या मुंबईत प्रतिदिन सार्वजनिक लसीकरण केंद्रावर फक्त 50 ते 90 हजार लोकांचे लसीकरण होत आहे.

नवरात्रीत लसीकरणाचा गती कमी झाल्याचं निर्देशनास आलं. गणपती पर्यंत लसीकरणासाठी लोक पुढे येत होते मात्र या महिन्यात रोजचे जवळपास 50 टक्के लसींच्या मात्र शिल्लक राहतायेत. पहिला आणि दुसऱ्या डोस मध्ये जास्त दिवसांचा अंतर असल्याने देखील दुसऱ्या डोस साठी लोक कमी येतात. अजूनही काही लोक लास घेण्याच्या विरोधात आहेत व लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची देखील गरज आहे, असं मुंबई महानारपालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाराने सांगितलं.

 

इतर बातम्या

विकासाच्या रेट्यात मुंबईतील 84 विहिरी गायब, सत्ताधाऱ्यांना आश्वासनचा विसर

गरिबांच्या भल्यासाठी काम करेन, NCB च्या समुपदेशनावेळी आर्यन खानचा वानखेडेंना शब्द

जर कोणी धर्माची मस्ती घेऊन माझ्यासमोर उभा राहिला तर मी कडवट हिंदू म्हणून त्याच्यासमोर उभा राहीन : मुख्यमंत्री

(mumbai vaccination bmc to give certificates to societies)