मुंबईसह उपनगरात रात्रीपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईच्या सर्व उपनगरात पावसाने धुमशान घातलं. जवळपास पाच-सहा तास तुफान पाऊस बरसला. मुंबईला पावसाने अक्षरशः झोडपून काढले.
रात्रभर मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे रस्त्यांना नद्यांचा स्वरुप आलेले पाहायला मिळालं. पावसाने अनेक ठिकाणी पाणी तुंबलं.
सखल भागात पाणी साचलंय. अनेक ठिकाणी गाड्या पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळालं.
मुंबईतील काही परिसरात अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं. अनेकांना तशाच अवस्थेत रात्र काढावी लागली.
मध्यरात्रीपासून कोसळणार्या पावसामुळे रस्त्यांना नदीचं रुप आलं होतं. हिंदमाता परिसरात पाणीच पाणी साचलं आहे. पाणी तुंबल्यामुळे परिसरातील गाड्या पाण्यात गेल्या. स्टेशन परिसरातही पाणी साचलेलं पाहायला मिळालं.
हिंदमाता परिसरात रात्री गाड्यांना मार्ग दाखवण्याचं काम सुरू होतं. काही जवानांकडून हे प्रयत्न सुरू होते.
दादर आणि परेल परिसरात रात्रीपासूनच प्रचंड पाणी साचलेलं होतं. या पाण्यातून गाड्यांनी मार्ग काढला.
रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे सकाळी नागरिकांना कामावर जाण्यात अनेक अडचणी आल्या. पाण्यातून या नागरिकांनी पायवाट काढली.
रेल्वे रुळावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं पाहायला मिळालं. त्यामुळे लोकल सेवेवर परिणाम झाला.