मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याचं पाहायला मिळालं आहे. मुंबई आणि उपनगरात 23 सप्टेंबर पर्यंत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्याचा अंदाज स्कायमेटकडून वर्तवण्यात आला आहे. मुंबईत काल रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. पश्चिम किनारपट्टीवर मान्सून सक्रिय असल्यानं मुंबईत मुसळधार पावसामुळं सखल भागात पाणी साचणार असल्याचा अंदाज स्कायमेटकडून वर्तवण्यात आला आहे. सांताक्रुझमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असून काल रात्रीपासून परिसरात 71 मिमी पाऊस झाल्याचं स्कायमेटचे महेश पलवत यांनी सांगितलं आहे.
#Rain to continue over #Mumbai and suburbs until September 23rd. Few heavy spells amy lead to waterlogging in low lying areas. #Monsoon surge to remain active over #Maharashtra coast. Download mumbairainapp from play store #MumbwiRain @SkymetWeather @JATINSKYMET @MumbaiRainApp pic.twitter.com/xAaYDkXhgT
— Mahesh Palawat (@Mpalawat) September 20, 2021
महाराष्ट्रात मान्सूनचा जोर कायम असल्याचं स्कायमेटचे महेश पुलावत यांनी सांगितलं आहे. त्यामुळे 23 सप्टेंबरपर्यंत मान्सूनचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. याशिवाय विदर्भातही पावसाचा जोर वाढला असून धरणांतील पाणी साठ्यात वाढ झाली असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईत काल रात्रीपासून जोरदार पावसानं हजेरी लावली. मुंबईत गेल्या 24 तासात साधारणपणे 71 मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती आहे. तर, रात्री सांताक्रुझमध्ये तर सकाळी लोअर परेल बागात दमदार पाऊस झाला आहे.
गोंदिया जिल्ह्यात आज सकाळ पासून पाऊस सूर असल्याने देवरी आमगाव रोड वरील डवकी गावाजवळील पुलावरून अर्धाफुट पाणी वाहत आहे. हा पूल तात्पुरता स्वरूपात येण्याजाण्यासाठी तयार करण्यात आला असून सुद्धा नागरिक मात्र जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. या पुलावरून राष्ट्रीय महामार्गावर जाणारी आणि राष्ट्रीय महामार्गावरून आमगाव आणि गोंदिया कडे येणारी जड वाहतूक, खाजगी वाहने आणि नागरिकांचे येणे जाणे सुरू आहे. आणि कधीही या पुलावरुन पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढू शकतो त्यामुळेच एखादी मोठी दुर्घटना होऊ शकते हे नाकारता येत नाही.
चंद्रपूर आज सकाळपासून आकाश ढगाळलेले होते. काल श्रीगणेश विसर्जन मिरवणुकीतही पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा बॅकलॉग आहे. अद्याप जलाशये-धरणे यात अल्प पाणीसाठा असून पाऊस परतल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गेल्या अर्ध्या तासापासून पडत असलेल्या कमी अधिक मुसळधार पावसाने जलाशयात पाणीसाठा वृद्धी होण्याची शक्यता आहे. पावसाळा संपत आला असताना जिल्ह्यातील पावसाची वार्षिक सरासरी 85 टक्के आहे.
इतर बातम्या:
नागपूरसह विदर्भाच्या काही भागात 2 दिवस अतिवृष्टीचा इशारा, पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता!
Mumbai Weather Forecast skymet predicts heavy rainfall at various places of mumbai during next three days