मुंबईत दररोज 2000 किलो कचऱ्यापासून वीज निर्मिती होणार; आदित्य ठाकरेंकडून प्रकल्पाचे लोकार्पण

| Updated on: Sep 03, 2021 | 7:27 PM

मुंबईतील पर्यटन स्थळांमध्ये एक महत्त्वाचे आकर्षण असणाऱ्या आणि राणीचा रत्नहार (Queen's Necklace) अशी ओळख असणाऱ्या मरिन ड्राईव्हलगत लवकरच एक नवे पर्यटन स्थळ आकारास येणार आहे.

मुंबईत दररोज 2000 किलो कचऱ्यापासून वीज निर्मिती होणार; आदित्य ठाकरेंकडून प्रकल्पाचे लोकार्पण
Follow us on

मुंबई : मुंबईतील पर्यटन स्थळांमध्ये एक महत्त्वाचे आकर्षण असणाऱ्या आणि राणीचा रत्नहार (Queen’s Necklace) अशी ओळख असणाऱ्या मरिन ड्राईव्हलगत लवकरच एक नवे पर्यटन स्थळ आकारास येणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या ‘डी’ विभाग क्षेत्रातील ‘स्वराज्यभूमी’ अर्थात गिरगाव चौपाटीच्या उत्तर टोकाला कविवर्य भा. रा. तांबे चौकालगत समुद्राचे आणि मरिन ड्राईव्हचे वैशिष्ट्यपूर्ण व मनमोहक दर्शन घडविणाऱ्या ‘दर्शक गॅलरी’चे भूमिपूजन पर्यटन व पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले. (Mumbai will generate electricity from 2000 kg of waste per day; Aditya Thackeray Inaugurated project)

याप्रसंगी मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर, सभागृह नेता श्रीमती विशाखा राऊत, सी व डी प्रभाग समिती अध्यक्षा श्रीमती मीनल पटेल, स्थानिक नगरसेविका ज्योत्स्ना मेहता, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार, उप आयुक्त (परिमंडळ 1) विजय बालमवार, ‘डी’ विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड, संबंधित उच्चस्तरीय समितीचे प्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमानंतर लगेचच वत्सलाबाई देसाई चौकानजीक (हाजीअली जवळील चौक) असणाऱ्या केशवराव खाड्ये मार्गालगत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भूखंडावर उभारण्यात आलेल्या कचऱ्यापासून वीज निर्मिती करणाऱ्या प्रकल्पाचे लोकार्पण आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या प्रकल्पामध्ये दररोज 2 हजार किलो कचऱ्याचा (Organic Waste) वापर करुन वीज निर्मिती केली जाणार आहे. तसेच दररोज सुमारे 250 ते 300 युनिट इतकी वीज निर्मिती होईल, अशी अपेक्षा आहे.

या प्रकल्पांतर्गत दररोज 2 हजार किलो कचऱ्यापासून प्रथम गॅस निर्मिती करण्यात येईल. त्यानंतर या गॅसचा उपयोग करुन जनित्राच्या आधारे वीज निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पातून दररोज साधारणपणे 250 ते 300 युनिट इतकी वीज निर्मिती होईल, अशी अपेक्षा आहे. सुरुवातीच्या टप्प्यात महापालिकेच्या एका उद्यानात व घन कचरा व्यवस्थापन खात्याच्या एका कचरा विलगीकरण केंद्रात या वीजेचा वापर केला जाणार आहे. या प्रकल्पामुळे महापालिकेच्या वीज खर्चात आंशिक बचत होण्यासह कचरा वाहून नेण्याच्या खर्चात देखील बचत करणे शक्य होणार आहे.

(Mumbai will generate electricity from 2000 kg of waste per day; Aditya Thackeray Inaugurated project)