नवी दिल्ली – देशात सध्या बरेचजण मोठ्या प्रमाणात ऑनलाईन शॉपिंग (online shopping)करतात. ग्रोसरी सर्व्हिस प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सहजपणे गरजेच्या वस्तू लोकांच्या घरी पोहचतात. अगदी भाज्यांपासून ते औषधांपर्यंत, फक्त स्मार्टफोनवरच्या (Smart phone)काही क्लिकद्वारे सामान तुमच्या दारापर्यंत पोहचते. एका सर्वेक्षणानुसार स्विगी इन्स्टामार्टने जून 2021 ते जून 2022 या काळात सुमारे 90 लाख ग्राहकांहून अधिक ग्राहकांना (customers)ही सेवा उपलब्ध करुन दिली आहे. मुंबई, हैदराबाद, दिल्ली आणि बंगळुरुसारख्या मोठ्या महानगरांमध्ये ऑनलाईन सामान खरेदी करण्याऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे.
ग्राहक ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून वैद्यकीय सुविधांबाबतच्या वस्तूही या प्लॅटफॉर्मवर ऑर्डर करता येतात. यातली एका सर्वेनुसार, गेल्या 12 महिन्यांत मुंबईकरांनी 570 पट अधिक कंडोम ऑर्डर केले आहेत. तर 2021साली इन्स्टामार्टला सुमारे 20 लाख सॅनिटरी नॅपकिन, मेन्स्ट्रुअल कप आणि टैम्पॉनच्या ऑर्डर करण्यात आल्या आहेत. यासह ग्रॉसरीच्याही अनेक वस्तूंच्याही खूप ऑर्डर करण्यात आल्या आहेत.
एका सर्वेक्षणानुसार, गेल्या वर्षी एप्रिल ते जूनच्या काळात मेट्रो शहरांत आइस्क्रिमच्या मागणीत 42टक्के वाढ झाली आहे. या सगळ्या ऑर्डर रात्री 10 नंतर देण्यात आल्याचेही समोर आले आहे. या मेट्रो शहरांमध्ये इन्स्टन्ट न्यूडल्सच्या 56 लाख पाकिटांची ऑर्डर देण्यात आली. एकट्या हैदराबादमध्ये उन्हाळ्यात युझर्सनी फ्रेश ज्यूसच्या 27 हजार बाटल्या मागवल्याचे समोर आले आहे.
गेल्या दोन वर्षांत अंड्यांची मागणी बरीच वाढली आहे. दिल्ली, मुंबईसहित मेट्रो शहरात राहणाऱ्यांनी गेल्या एका वर्षात सुमारे 60 लाख अंड्यांची ऑर्डर केली आहे. बंगळुरु आणि हैदराबादमध्ये सकाळच्या ब्रेकफास्टसाठी सर्वाधिक अंड्यांच्या ऑर्डर देण्यात आल्या आहेत. तर मुंबई, जयपूर आणि कोइम्बतूरमध्ये युझर्सनी डिनरसाठी अंड्यांच्या ऑर्र केल्याची माहिती आहे.
चहा आणि कॉफीच्या ऑर्डरमध्येही मोठी वाढ झाल्याचे दिसले आहे. रिपोर्टमधील माहितीनुसार, या मागणीत 2000टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे. तर दुधासाठी 3 कोटी ऑर्डर्स आल्या आहेत. बंगळुरु आणि मुंबईत सकाळच्या वेळी या ऑर्डर सर्वाधिक आहेत. रेग्युलर दूध, फुल क्रीम मिल्क आणि टोंड दूध यांना सर्वाधिक मागणी आहे.
गेल्या वर्षभरात 62 हजार टन फळे आणि भाज्यांच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. 12 हजार ऑर्डरसह बंगळुरु ऑर्गेनिक प्रो़डक्टच्या खरेदीत अग्रस्थानी आहे. हैदराबाद आणि बंगळरुत गेल्या 12 महिन्यांत 290 टन हिरवी मिर्ची ऑर्डर करण्यात आली आहे. बाथरुम क्लीनर, स्क्रब पॅड, ड्रेन क्लीनरच्याही २ लाखांहून अधिक ऑर्डर आल्या आहेत.