मुंबईतील पहिली भूयारी रेल्वे लवकरच सुरु होत आहे. कुलाबा ते सिप्झ व्हाया बीकेसी अशा भूयारी मेट्रोचा पहिला टप्पा लवकरच सुरु होणार आहे. त्यामुळे लवकरच मुंबईकरांना आनंदाची बातमी मिळणार आहे. मुंबईची पहीली भूमिगत मेट्रो ( (Aqua Line ) लवकरच सुरु होत आहे. या शहराच्या वेगाला या भूयारी मेट्रोमुळे नवा पर्याय मिळणार आहे. येत्या 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र विधानसभेची टर्म संपत आहे. त्याआधी निवडणूका जाहीर कराव्या लागणार आहेत. त्यामुळे जुलैअखेर किंवा 15 ऑगस्टचा मुहूर्त साधून मेट्रोचा पहिला टप्पा सुरु केला जाऊ शकतो असे म्हटले जात आहे.
मुंबईतील मेट्रो – 3 हा कुलाबा – बीकेसी – सिप्झ असा 33 किमीचा भूयारी मार्ग आहे. या मेट्रोचा पहिला बीकेसी ते आरे असा टप्पा तयार असून त्याचे उद्घाटन लवकरच होऊ घातले आहे. मुंबई मेट्रो तीनची आरडीएसओची ट्रायल 24 जून रोजी पार पडली होती. या मेट्रोचा बीकेसी ते आरे कॉलनीचा पहिला टप्पा आता प्रवाशांच्यासाठी खुला होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या मेट्रो तीनचा मार्गिकेसाठी आरे कॉलनीतील कारशेडचा मुद्दा चांगलाच वादात सापडला होता. या पर्यावरणवादी तसेच कोर्टात प्रकरण गेल्यानंतर आणि कोरोना साथ या अनेक अडचणींमुळे कारशेड उभारण्यासाठी बराच वेळ खर्ची पडला. त्यामुळे इतक्या संकटातून मुंबईची मेट्रो तीन हा भूयारी मेट्रोचा पर्याय मुंबईकरांना आता मिळणार आहे. त्यामुळे आतापर्यंत रेल्वे आणि मेट्रोशी कनेक्टेट नसलेला भाग प्रथमच मेट्रो मार्गिकांशी जुळला जाणार आहे. भूयारी मार्गिकेत एकूण 27 स्थानके आहेत.
मुंबईच्या भूयारी मेट्रोचा बीकेसी ते आरे कॉलनी हा पहिला टप्पा येत्या 24 जुलै रोजी सुरु होणार असे एक्स माध्यमावर भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी पोस्ट टाकत जाहीर केले होते. त्यानंतर या पोस्टवर अनेक प्रतिक्रीया आल्या. अनेकांनी तर विनोद तावडे हेच आता पुढील मुख्यमंत्री असतील असे म्हटले. या ट्वीटमध्ये पंतप्रधान यांच्या हस्ते भूयारी मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होणार असल्याचे म्हटले होते. मात्र काही तासांनंतर हे ट्वीट विनोद तावडे यांनी रदद् केले.
भूयारी मेट्रो चाचणीचा व्हिडीओ येथे पाहा –
#MMRC has successfully completed Research Designs and Standards Organisation #RDSO trials of Rolling Stock for #MetroLine3. Testing of other electrical systems and integrated testing of Rolling Stock with signaling is in progress. After completion of testing, the Commissioner of… pic.twitter.com/GnH51CfQIU
— MumbaiMetro3 (@MumbaiMetro3) June 24, 2024