मुंबई : महाराष्ट्रात सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने कोरोना नियंत्रणासाठी कंबर कसलीय. सरकारने कोरोना संसर्गावर नियंत्रणासाठी आणि संसर्गाची साखळी तोडण्यासाठी ‘3T’ उपाययोजना करण्यास सुरुवात केलीय. स्वतः राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिलीय. राज्यात रविवारी (28 मार्च) कोरोना रुग्णांच्या संख्येने एका दिवसात 40 हजार रुग्णांचा टप्पा पार केलाय. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत (MVA Government announce 3T program to stop corona infection in Maharashtra).
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, “राज्य सरकार ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रीटमेंट या त्रिसुत्रीवर भर देत आहे. याशिवाय आम्ही महाराष्ट्रात कोरोना लसीकरणाची केंद्रे वाढवण्यासाठीही प्रयत्न करत आहोत. सध्या राज्यात बेड्स, औषधं आणि डॉक्टर्सची कोणतीही कमतरता नाही. जर कोरोना रुग्णांची संख्या वाढतच राहिली तर आम्हाला कोणता ना कोणता निर्णय घ्यावा लागणार आहे.”
We’re increasing testing, tracking & tracing in the State. We are also going to increase the number of vaccination centres. Today, there is no shortage of beds, medicines, doctors. If the number of cases keeps rising,then, we’ll have to take a decision:Maharashtra Health Minister pic.twitter.com/bBBIXoauUo
— ANI (@ANI) March 31, 2021
‘नागरिक उशिरा रुग्णालयात जात असल्यानं आयसीयू आणि ऑक्सिजनचे बेड्स संपत आहेत’
दरम्यान याआधी राजेश टोपे यांनी नागरिकांना चाचणी करण्याचं आवाहन केलंय. “नागरिक उशिरा रुग्णालयात जात असल्याने रुग्णालयांमधील आयसीयू आणि ऑक्सिजनचे बेड्स संपत आहेत. या नागरिकांनी वेळेवर चाचणी न केल्याने हे परिणाम होत आहेत. म्हणूनच सर्व नागरिकांना वेळेवर कोरोना चाचणी करण्याचं आवाहन करतो. राज्यात लॉकडाऊन लागू करणं हा सरकारपुढील सर्वात शेवटचा पर्याय आहे. कुणालाही राज्यात लॉकडाऊन नको आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही लॉकडाऊन लागू करण्याची इच्छा नाहीये. तो आमच्यासाठी शेवटचा मार्ग आहे,” असं मत राजेश टोपे यांनी व्यक्त केलं.
“नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागावा असं आम्हाला वाटत नाही”
लॉकडाऊन लागू करणं चुकीचं नाही, मात्र त्यामुळे खूप अडचणी तयार होतील, असंही त्यांनी नमूद केलं. लॉकडाऊनवरुन महाविकासआघाडीच्या अनेक नेत्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचं समोर येत आहे. राजेश टोपे यांचे मंत्रिमंडळातील सहकारी नवाब मलिक यांनी लॉकडाऊनच्या उपयोगितेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक म्हणाले, “लॉकडाऊन लागू केल्यास लोकांवर याचा वाईट परिणाम होईल. नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागावा असं आम्हाला वाटत नाही.”
“फेरीवाले आणि कामगारांना आधी आर्थिक भरपाई द्या”
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही राज्यात लॉकडाऊनला विरोध केलाय. “सरकारने लॉकडाऊनचा सर्वाधिक परिणाम होणाऱ्या फेरीवाले आणि कामगारांना आधी आर्थिक भरपाई द्यावी आणि मग लॉकडाऊन लागू करावा, असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं.”
हेही वाचा :
25 वर्षावरील सहव्याधीग्रस्त तरुणांनाही कोरोना लस द्या, राज्य मोदी सरकारकडे मागणी करणार
राष्ट्रपती कोविंद यांची बायपास सर्जरी होण्याची शक्यता, एम्समध्ये दाखल
महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढत असताना मोदींना पाकिस्तानची चिंता : नाना पटोले
व्हिडीओ पाहा :
MVA Government announce 3T program to stop corona infection in Maharashtra