मुंबई : सध्या महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Budget Session) राज्य सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्यातील संघर्ष वाढल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात महाविकास आघाडी सरकारच्या आमदारांनी घोषणाबाजी केली होती. यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारचं शिष्टमंडळ आठवड्यात दुसऱ्यांदा राज्यपालांच्या भेटीला गेलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले होते. अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी राज्यपालांसोबत विधानसभा अध्यक्षांची निवडणुकीसंदर्भात चर्चा केली असल्याची माहिती आहे. राज्य सरकारचा विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक 9 मार्चला घेण्याचा प्रयत्न आहे. राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी केल्याची माहिती आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले आहेत. विधानसभा अध्यक्ष निवडणूक 9 मार्चला घेण्यासाठी महाविकास आघाडीनं परवानगी मागितली आहे. विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यासाठी राज्य सरकारनं नियमात बदल केला होता. विधानसभा अध्यक्षांची निवड आवाजी पद्धतीनं करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या निवडणूक प्रक्रियेसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी केली असल्याचं कळतंय.
महाविकास आघाडी सरकारचं स्थापन झाल्यापासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि सत्ताधारी आघाडी यांच्यात संघर्ष सुरु राहिलेला आहे. या वादाचा अंक विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याचं दिवशी दिसून आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्याच्या दौऱ्यावर असताना अजित पवार यांनी राज्यपालाचं नाव न घेता मुद्दा मांडला होता. ठाकरे सरकार आणि राज्यपाल यांच्यातील वाद कमी करण्यासाठी देखील प्रयत्न सुरु असल्याचं दिसतंय. अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची मनधरणी केल्याचा प्रयत्न केलाय, आता त्याला यश मिळणार का हे पाहावं लागेल.
दरम्यान, याच निवडणुकीवर,भाजप नेते गिरीश महाजन विधानसभा अध्यक्ष निवडीच्या प्रक्रिये विरोधात उच्च न्यायालयात गेले आहेत. त्यांनी न्यायालयानं सांगितलेले 10 लाख रुपये भरले आहेत. उच्च न्यायालयात गिरीश महाजन यांच्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. या सुनावणी पूर्वी,राज्यपाल परवानगी देतात का ? हा प्रश्न अनुत्तरीत राहिला आहे.
इतर बातम्या: