मुंबई: हिंमत असेल तर राजीनामा देऊन मैदानात या, असं आव्हान भाजप नेते अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं. शहा यांच्या या आव्हानावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पलटवार केला आहे. निवडणुका घ्यायच्याच आहेत तर आधी केंद्र सरकारने राजीनामा द्यावा, असं आव्हानच नाना पटेला यांनी दिलं आहे.
नाना पटोले यांनी मीडियाशी संवाद साधताना हे आव्हान दिलं आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने राजीनामा देऊन निवडणुका घ्यावात हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे वक्तव्य चुकीचे असून त्यांनी लोकशाहीचा सन्मान करायला शिकले पाहिजे. सत्तेच्या गुर्मीत असणारेच अशी वक्तव्ये करतात. महाराष्ट्र सरकारबरोबरच केंद्रातील भाजपा सरकारही बरखास्त करा आणि निवडणुका घ्या, मग पहा भाजपाविरोधात देशातील जनतेत किती असंतोष आहे हे तुम्हाला कळेल, असे प्रतिआव्हानच नाना पटोले यांनी दिले आहे.
मुख्यमंत्र्यांना शोधावे लागते असे म्हणणाऱ्या अमित शहा यांनी पंतप्रधान कुठे असतात ते सांगावे. कोरोनाकाळात लाखो हिंदू लोकांचाही जीव गेला. त्यावेळी हिंदुत्वाचे हे ठेकेदार काय करत होते? कोरोनाकाळात पंतप्रधान गायबच होते, ते फक्त टीव्हीवरच दिसायचे, त्यांनाच शोधावे लागत होते. 14 महिने शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत होता तेव्हा पंतप्रधान शेतकऱ्यांना भेटताना दिसले नाहीत, तेव्हा पंतप्रधान कुठे होते ? असे सवालही त्यांनी केला.
‘डीबीटी’ म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही योजना 1 जानेवारी 2013 रोजी काँग्रेस प्रणित यूपीए सरकारने सुरु केली. त्याचे श्रेयही अमित शहा भाजपाला देत आहेत हे दुर्दैवी आहे. काँग्रेसच्या चांगल्या योजना स्वतःच्या नावावर खपवून बिनदिक्कतपणे खोटे बोलणे ही भाजपची पद्धतच आहे. पण त्या योजनेचा शब्दच्छल करत ‘डिलर’, ‘ब्रोकर’, ट्रान्सफर अशा उपमा देत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेवर टीका करणारा भाजपच खऱ्या अर्थाने या देशातील सर्वात मोठा ‘डिलर’ व ‘ब्रोकर’ आहे. ‘राफेल’ सौद्यात करोडो रुपयांची दलाली कोणी खाल्ली? नोटबंदीमध्ये नोटा बदलण्याच्या कामात कोणत्या पक्षाच्या लोकांनी भरमसाठ दलाली केली? आणि देशातील सार्वजनिक बँका, विमानसेवा, विमानतळ, रेल्वे, रस्ते, विमा कंपनी हे खासगी उद्योगपतींच्या घशात घालण्याच्या ‘डिल’ कोणी केल्या आणि त्यासाठी ‘ब्रोकर’चे काम करत कोणी पैसे खाल्ले हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे आतातरी भाजपाने महाराष्ट्र विकास आघाडीला बदनाम करण्याचे उद्योग थांबवावेत, असं ते म्हणाले.
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 20 December 2021#Fastnews #News https://t.co/ZVrpFyfwmI pic.twitter.com/Wk8deOGk4T
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 20, 2021
संबंधित बातम्या:
Sangli: निकालाच्या वेळी माझ्या बापाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही! रोहित पाटील यांची भावनिक साद