Nana Patole : नाना पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना करून दिली किमान समान कार्यक्रमाची आठवण, पत्रात नेमकं काय?

| Updated on: Mar 30, 2022 | 5:12 PM

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole latter to Cm) यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राने या चर्चांणा आणखी खतपाणी मिळालं आहे. नाना पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित महाविकास आघाडीतील समाना किमान कार्यक्रमाची (Minimum common Program) आठवण करून दिलीय.

Nana Patole : नाना पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना करून दिली किमान समान कार्यक्रमाची आठवण, पत्रात नेमकं काय?
नाना पटोलेंनी मुख्यत्र्यांना समान किमान कार्यक्रमाची आठवण करून दिली
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi) धुसफूस सुरू असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole latter to Cm) यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राने या चर्चांणा आणखी खतपाणी मिळालं आहे. नाना पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित महाविकास आघाडीतील समाना किमान कार्यक्रमाची (Minimum common Program) आठवण करून दिलीय. मात्र काँग्रेसकडून याबाबत स्पष्टीकरणाही देण्यात आलंय. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षाने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना किमान समान कार्यक्रमाच्या (CMP)आधारे हे सरकार चालवण्याचे ठरले होते. कोरोना संकटामुळे त्याची अंमलबजावणी करण्यात अडथळा आला होता. परंतु आता परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे. त्यामुळे पुन्हा उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

पत्रात नाना पटोले काय लिहितात?

मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नाना पटोले म्हणतात, जातीयवादी शक्तींना सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी आणि समाजातील सर्व घटकांचा सर्वांगिण विकास साधण्याच्या हेतूने 2019 साली तीन पक्ष एकत्र आले. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनियाजी गांधी यांच्या सुचनेनुसार किमान समान कार्यक्रमाच्या आधारे हे सरकार चालेल असे ठरलेले आहे. राज्यातील सर्व समाज घटकांना न्याय देण्याची काँग्रेस पक्षाची भूमिका राहिलेली आहे. सोनियाजी गांधी यांनी दलित, ओबीसी, आणि अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठीच्या योजनांवर सरकारने काम करावे यासाठी मुख्यमंत्र्यांना याआधीही पत्र पाठवले होते. कोरोनामुळे राज्य सरकारपुढे अडचणी होत्या. पण या कठीण प्रसंगीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मविआ सरकारने चांगले काम केले आहे. आता सर्व व्यवहार सुरुळीत सुरु असून अर्थव्यवस्थाही रुळावर आलेली आहे. आता सीएमपी व दलित, ओबीसी अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणकारी योजनांची अंमलबाजवाणी करण्याची कार्यवाही लवकरात लवकर करावी, असे नाना पटोले यांनी पत्रात लिहिल्याचे सांगण्यात आले आहेत.

पत्रावर नाना पटोलेंचं स्पष्टीकरण

तसेच पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार स्थिर आहे, सरकारला कोणताही धोका नाही. नाराजीच्या काही बातम्या येत आहेत. त्यात काही तथ्य नाही आघाडी सरकारमध्ये असे प्रकार होत असतात. त्यात नवे काही नाही. शिवसेना व भाजपाचे सरकार असतानाही सर्व काही आलबेल होते का? हे सरकार तीन पक्षाचे आहे, काही मुद्द्यांवर आमदारांनी किंवा नेत्यानी वरिष्ठ नेत्याची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली असेल तर त्यात काही गैर नाही. भाजपाकडून आमदार नाराज असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत, असे स्पष्टीकरणही नाना पटोले यांनी या पत्रावर दिले आहे.

AAP Vs MVA Vs BJP: मुंबईत राजकारणाचा खो खो, आपच्या तक्रारीवर आघाडी सरकारची कारवाई, भाजप टार्गेट!

त्यांना बेघर होऊ देऊ नका, रेल्वेमार्गालगच्या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करा-मनोज कोटक

Chandrakant Khaire: 32 वर्ष वाट पहाण्यात गेले, हिशेब करतो आहे मुंबईत घर का नाही झाले ? खैरंची खंत