मुंबई: भाजपच्या महिला कार्यकर्त्या आंदोलन करत आहेत. पण त्यांची मातृसंस्था असलेली आरएसएस लग्नाला कंत्राट समजते, त्यावर त्यांचं काय म्हणणं आहे, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे. विधान भवन परिसरात मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हा टोला लगावला. (nana patole taunts bjp over rss ideology of marriage)
जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. त्यावरून नाना पटोले यांनी भाजपला टोला लगावला. भाजपच्या महिला कार्यकर्त्या आंदोलन करत आहेत. त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. पण त्यांची मातृसंस्था असलेल्या संघाचं मत काय आहे. ते लग्नाला कंत्राट समजतात, त्यावर काय म्हणणं आहे, असं पटोले म्हणाले.
तर नाणार प्रकल्प विदर्भात न्या
नाना पटोले यांनी नाणारवरूनही काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. नाणार प्रकल्प कोकणात होत असेल तर हरकत नाही. पण हा प्रकल्प कोकणात होत नसेल तर तो विदर्भात नेला पाहिजे ही आमची मागणी आहे, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी अर्थसंकल्पावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. अर्थसंकल्पातून सर्वांनाच अपेक्षा असतात. चांगला अर्थसंकल्प मिळेल ही अपेक्षा असते, असं सांगतानाच पण इंधना संदर्भात केंद्राने योग्य भूमिका घ्यायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली.
आशिष देशमुख मुख्यमंत्र्यांना भेटले
दरम्यान, नाणार प्रकल्पावरून शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपलेली असतानाच काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी नाणार प्रकल्प विदर्भात आणण्याची मागणी केली आहे. नाणार प्रकल्प विदर्भात आल्यास त्याचा विदर्भातील जनतेला फायदाच होईल, असं देशमुख यांनी म्हटलं आहे.
नाणार रिफायनरी प्रकल्प नेमका काय?
कोकणातील निसर्गसंपन्न अशा रत्नागिरी-सिंधुदुर्गाच्या सीमेवर नाणार तेलशुद्धीकरण (रिफायनरी) प्रकल्प प्रस्तावित होता. रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील 14 गावं आणि सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यातील 2 गावांमध्ये प्रकल्पाचा विस्तार होणार होता. 13000 एकरावर हा प्रकल्प उभारला जाणार होता. नागरिकांचा विरोध असतानाही, या गावांमधील क्षेत्र 18 मे 2017 रोजी आद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलं. हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या तीन सरकारी कंपन्या नाणार रिफायनरी प्रकल्प उभारत असून, त्यांची संयुक्तपणे रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल लिमिटेड म्हणजेच RRPCL कंपनी 22 सप्टेंबर 2017 रोजी स्थापन करण्यात आली.
काही महिन्यांपूर्वीच सौदी अरेबियाच्या अरामको कंपनीशी नाणार रिफायनरीबाबत करार झाला. नाणार रिफायनरीच्या उभारणीला तीन लाख कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. आशियातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प असल्याचे सांगण्यात येत असून, 2023 पर्यंत हा प्रकल्प कार्यन्वित करण्याचा सरकारचा विचार आहे. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे, प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पापासून अवघ्या 15-16 किलोमीटरच्या अंतरावर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आहे. (nana patole taunts bjp over rss ideology of marriage)
LIVE : महत्त्वाच्या घडामोडी https://t.co/fOwG3aAyYw
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 8, 2021
संबंधित बातम्या:
आकडा फायनल झाल्यावर शिवसेनाही नाणारला पाठिंबा देईल; नितेश राणेंचा गंभीर आरोप
हिंमत असेल तर राज यांनी नाणारवासियांसमोर भूमिका मांडावी; शिवसेनेचं आव्हान
नाणारमध्ये 221 गुजराती भूमाफियांच्या जमिनी; राज ठाकरेंचं अचानक मनपरिवर्तन कसं झालं: विनायक राऊत
(nana patole taunts bjp over rss ideology of marriage)