मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतलीय. शिवतीर्थावर जवळपास दीड तास बैठक झाली. अचानक थर्टी फर्स्टला झालेल्या या बैठकीत 2023 साठी कोणता राजकीय प्लॅन ठरलाय का? अशा चर्चांना उधाण आलंय. थर्टी फस्टला झालेली ही भेट, राजकीय वर्तुळात अधिक चर्चिली जात आहे . केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. विशेष म्हणजे राणेंची सपत्नीक भेट होती. जवळपास दीड तास राणे शिवतीर्थावर होते. त्यामुळं दीड तास राणे आणि राज ठाकरेंमध्ये काय बोलणं झालं? यावरुन चर्चेला उधाण आलंय. राज ठाकरे आणि राणेंमध्ये गॅलरीतही काही काळ गप्पा झाल्या. मात्र या भेटीनंतर राणेंनी माध्यमांशी बोलणं टाळलं.
पण आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरुन चर्चा झाल्याची शक्यता आहे. काही दिवसांआधी राज ठाकरेंनी कोकणाचा दौरा केला. कोकणात ठाकरे गटाला खिंडीत गाठण्यासाठी रणनीती होऊ शकते.
मात्र ठाकरे गटानं या भेटीवरुन नारायण राणे आणि राज ठाकरेंवर टीका केलीय.
नारायण राणे असो की राज ठाकरे या दोघांचेही कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी उद्धव ठाकरेच आहेत. त्यामुळंच भेटीकडे राजकीय वर्तुळातूनही वेगळ्या नजरेनं पाहिलं जातंय. आणि या भेटीचं टायमिंगही खास आहे.
हिवाळी अधिवेशन संपताच दुसऱ्याच दिवशी, राणे राज ठाकरेंच्या भेटीला आले. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात उद्धव ठाकरे आणि शिंदे आमनेसामने आले होते.
प्रत्येक भेटीमागं काही ना काही अर्थ असतोच, राणेंनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर बोलणं टाळल्यानं सस्पेंस आणखी वाढवलाय!