वैभव नाईक थांबला कुठे, पळाला; सिंधुदुर्गातल्या राड्यावर नारायण राणेंचं वक्तव्य

| Updated on: Jun 19, 2021 | 5:55 PM

नारायण राणे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना कुडाळमधील त्यांच्या पेट्रोल पंपावरील राड्याबाबत विचारण्यात आलं. (Shivsena and BJP workers clash in Konkan)

वैभव नाईक थांबला कुठे, पळाला; सिंधुदुर्गातल्या राड्यावर नारायण राणेंचं वक्तव्य
केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे
Follow us on

मुंबई: सिंधुदुर्गातल्या कुडाळ पेट्रोल पंपावर झालेल्या राड्यावर भाजप खासदार नारायण राणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्या पेट्रोल पंपावर वैभव नाईक थांबला कुठे, तो पळाला. तिथे राडाबिडा काही झाला नाही, असं नारायण राणे यांनी स्पष्ट केलं. (narayan rane reaction on Shiv Sena and BJP workers clash in Konkan)

नारायण राणे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना कुडाळमधील त्यांच्या पेट्रोल पंपावरील राड्याबाबत विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी ही माहिती दिली. पेट्रोल पंपावर रिक्षावाले आले होते. तिथे पेट्रोल वाटलं. त्यात आंदोलन कुठे आलं? त्या ठिकाणी वैभव नाईक आला कुठे, तो तर पळाला. तो थांबलाही नाही. आजचे पेपर पाहा. राडाबिडा काही झाला नाही, असं राणे म्हणाले.

राणे स्टाईलनेच थाळी मिळेल

यावेळी नारायण राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. जो कुणाला थप्पड मारू शकला नाही तो उघड उघड धमक्या देतोय. मी इथेच थांबतो. बघू कोण कुणाला शिवथाळी देतोय. त्यांना राणे स्टाईलनेच भाजपकडून थाळी मिळेल. त्यात राणे असतील, असं सांगतानाच राणे जेव्हा मैदानात उतरतात तेव्हा पळणाऱ्यांना पळून जाण्याची संधी देत नाहीत. महिलांवर ज्यांनी हात उचलले त्यांची नावं आमच्याकडे आली आहेत. त्यांना पाहून घेऊ. या लोकांना शिवथाळी दिल्याशिवाय स्वस्थ झोपणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

पेट्रोल पंपावर काय घडलं नेमकं?

शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त वैभव नाईक यांनी भाजपला डिवचण्यासाठी येथील एका पेट्रोल पंपावर स्वस्तात पेट्रोल वाटप सुरू केले होते. मात्र, हा पेट्रोलपंप नेमका नारायण राणे यांच्या मालकीचा निघाला. वैभव नाईक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते पेट्रोल पंपावर नागरिकांना पेट्रोल खरेदी करण्यासाठी पैसे वाटत होते. त्यावेळी भाजपचे कार्यकर्ते त्याठिकाण आले आणि त्यांनी आक्षेप घेतला. तेव्हा दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी घोषणबाजी सुरू केली आणि एकमेकांच्या अंगावर धावून गेले. विशेष म्हणजे आमदार वैभव नाईक यांनीही या हाणामारीत भाग घेण्याचा प्रयत्न केला. ते भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर धावूनही गेले होते. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. यानंतर वैभव नाईक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते दुसऱ्या पेट्रोल पंपावर निघून गेले.

निलेश राणेंचं ट्विट

या राड्यानंतर भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी लगेचच ट्विट करत शिवसेनेवर हल्लाबोल केला. शिवसेना (Shivsena) पक्ष इतका भिकारी झाला आहे की त्यांच्या आमदाराला दुसऱ्यांच्या पेट्रोल पंपावर फुकट पेट्रोल भरून शिवसेनेचा वर्धापन दिवस साजरा करायचा आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक भिकाऱ्यासारखा पंपाबाहेर उभा होता. तेव्हा त्याला तिथून हाकलून दिलं. ही लायकी आजच्या शिवसेनेची आहे, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे. आता या ट्विटला शिवसेनेकडून काय प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (narayan rane reaction on Shiv Sena and BJP workers clash in Konkan)

 

संबंधित बातम्या:

…तर ‘सामना’च्या ऑफिसमध्ये येऊन ‘प्रसाद’ देईन; नितेश राणेंचा संजय राऊतांना इशारा

शिवसेना भवनानंतर कोकणातही राडा, आमदार वैभव नाईक राणेंच्या पेट्रोल पंपावर, सेना-भाजप धुमश्चक्री

नारायण राणेंच्या पेट्रोल पंपावर शिवसेनेचा राडा; निलेश राणे संतापाच्या भरात म्हणाले…

(narayan rane reaction on Shiv Sena and BJP workers clash in Konkan)