मालवण येथील शिवजी महाराज पुतळा कोसळ्याप्रकरणी महाविकास आघाडीकडून राज्यभरात आंदोलन उभारले जात आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार अन् देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा माफी मागितली. त्याचवेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रकरणावरुन काँग्रेसला घेरले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारंवार अपमान केला जातो. परंतु त्यांनी कधी माफी मागितली नाही. उलट ते कोर्टात गेले आहे, असा हल्ला राहुल गांधी यांचे नाव न घेता मोदींनी काँग्रेसवर केला. शिवसेना उबाठाला यामाध्यमातून मोदी यांनी आरसा दाखवला. कारण काँग्रेसच्या सावरकर यांच्या भूमिकेवरुन शिवसेना उबाठाने कधी ठोस भूमिका घेतली नाही.
भारताचे महान सुपुत्र वीर सावरकरांना त्यांच्याकडून शिव्या दिल्या जातात. अपमानित केले जाते. देशभक्तांच्या भावनांचा चुरडा केले जाते. त्यांच्याकडून वारंवार वीर सावरकरांचा अपमान करूनही माफी मागत नाही. उलट ते कोर्टात जातात, पण त्यांना पश्चात्ताप होत नाही. हे त्यांचे संस्कार आहे. परंतु आमचे संस्कार वेगळे आहे.
मी महाराष्ट्राच्या भूमीवर आल्यावर शिवाजी महाराजांच्या चरणावर डोके टेकवून माफी मागत आहे. जे लोक शिवाजी महाराजांना अराध्य दैवत मानतात त्यांच्या काळजाला ठेच लागली आहे. या आराध्य दैवतेचे पूजा करणाऱ्यांची मी माफी मागतो. आमचे संस्कार वेगळे आहे. आमच्यासाठी अराध्य दैवतेपेक्षा काहीच मोठे नाही, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
या पोर्टवर ७६ हजार कोटींहून अधिक जास्त रक्कम खर्च करणार आहोत. हे देशातील सर्वात मोठं कंटेनर पोर्ट असेल. देशच नाही तर जगातील सर्वात मोठं पोर्ट असणार आहे. आज देशातील सर्व कंटेनर पोर्टातून जेवढे कंटेनर येतील जातील, संपूर्ण देशातील मी सांगतो, त्याच्यापेक्षा जास्त कंटेनरचं काम एकट्या वाढवण बंदरात होणार आहे. तुम्ही अंदाज लावू शकता, हे पोर्ट महाराष्ट्र आणि देशाच्या व्यापाराचा औद्योगिक प्रगतीचं किती मोठं केंद्र होईल, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले.
हे ही वाचा…
पालघरमध्ये तिसरे विमानतळ उभारा; देवेंद्र फडणवीस यांची मोदींकडे मोठी मागणी