मुंबईः पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीनंतर जाहीर झालेल्या निकालानंतर राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी आता एकमेकांवर जोरदार हल्लाबोल करण्यास सुरूवात केली आहे. एकीकडे नागपूर विभागात महाविकास आघाडीने आपला उमेदवार निवडून आणला आहे. त्यामुळे भाजपच्या बालेकिल्ल्यात जाऊन महाविकास आघाडीने विजय मिळवल्याबद्दल भाजपला निकालात काढले आहे तर दुसरीकडे कोकण हा ठाकरे गटाचा बालेकिल्ला समजला जातो त्या विभागात भाजप आणि शिंदे गटाच्या उमेदवाराने विजय मिळवल्याबद्दल शिंदे गटाने ठाकरे गटाला निकालात काढले आहे.
त्यांच्या या विजयाबद्दल बोलताना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे की, कोकण शिक्षक मतदारसंघांमध्ये जो आम्हाला विजय मिळाला आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे अशी टीका त्यांनी केली आहे.
शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटावर टीका करताना आणि शिक्षक मतदार संघाचा उमेदवार निवडून आल्याबद्दल विश्वास व्यक्त केला आहे.
तर आतापर्यंत ठाकरे गट म्हणत होते की कोकण आमचा बालेकिल्ला आहे. मात्र आता तो कोकणच्या शिक्षक मतदारांनी दाखवून हा बालेकिल्ला कोणाचा आहे.
हेच एकप्रकारे दाखवून दिले आहे अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे. आम्ही भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेनाचा युतीच्या बाजूनी आहोत बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांचा बाजूनी आहोत.
त्यामुळे आम्हाला विजयी केले आहे तर कोकणच्या जनतेने बाळासाहेब ठाकरे गटाला लथाडले असल्याची टीका त्यांनी केली आहे. कोकणच्या मतदारांनी ठाकरे गटाला त्यांच्याच बालेकिल्ल्यात त्यांना नाकारले आहे.
कारण ठाकरे गटाने बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार त्यांनी सोडलेला आहे. त्यामुळेच त्याची झलक शिक्षक मतदार संघामध्ये दिसून आलेली आहे.
उमेदवार जर आमचा असला तरीसुद्धा भारतीय जनता पार्टी यांनी आणि आमच्या शिक्षक परिषदमार्फत त्या ठिकाणी आमचा उमेदवार उभा केला होता. आम्ही दोघांनी मिळून एकत्र काम केलं आहे.
या निवडणुकीत जे 91 टक्के मतदान झालेले आहे. त्या मागचे खरे कारण हे कोकणातील मतदारांनी रागाने ठाकरे गटाला मतदानातून नकार दिला आहे.तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या निवडणुकीच्या माध्यमातून पाठिंबा दिला आहे.