तरुणीला 3 दिवसांत 5 रुग्णालयात उपचारासाठी फिरवलं, पालिकेच्या हलगर्जीपणामुळे अखेर मृत्यू

| Updated on: Oct 03, 2020 | 2:08 PM

श्वसनाचा त्रास होत असलेल्या एकाही रुग्णालयाने ऑक्सिजन आणि चक्का पाणीसुद्धा पिण्यासाठी न दिल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे.

तरुणीला 3 दिवसांत 5 रुग्णालयात उपचारासाठी फिरवलं, पालिकेच्या हलगर्जीपणामुळे अखेर मृत्यू
Follow us on

नवी मुंबई: कोरोनोच्या कठीण काळात आरोग्य व्यवस्थेचा आणखी एक भोंगळा कारभार समोर आला आहे. नवी मुंबईच्या वाशीमधील महापालिका रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे 20 वर्षीय तरुणीचा बळी गेला असल्याचा आरोप मृत मुलीच्या पालकांनी केला आहे. श्वसनाचा त्रास होत असलेल्या एकाही रुग्णालयाने ऑक्सिजन आणि चक्का पाणीसुद्धा पिण्यासाठी न दिल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे संबंधित वैद्यकिय अधिकारी व स्टाफ वर कारवाई करण्याची मागणी मृत तरुणीच्या वडिलांनी केली आहे. (navi mumbai corona news girl died because of hospital ignorance)

नवी मुंबई तुर्भे इथं राहणाऱ्या बाळू कसबे यांच्या पूजा कसबे या 20 वर्षीय मुलीला श्वसनाचा त्रास होता, त्यामुळे तिला नेरुळ इथल्या डी वाय पाटील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं. मात्र तिथे तिच्यावर उपचार न करता तिला नेरुळमधील स्वर्गीय मीनाताई ठाकरे रुग्णालयात पाठवण्यात आलं. पण यानंतर पुन्हा तिला वाशीमधील पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. यानंतर ऑक्सिजन लावण्यात आलं आणि तिची कोविड चाचणी केली. पण त्याचा अहवाल निगेटिव्ह आला.

यानंतर वाशीमधूनही तिला नॉन कोविड रुग्णालय पाठवण्याचा सल्ला देण्यात आला. रुग्णालय शोधण्यासाठी वडिलांनी खूप वणवण केली. याचवेळी वाशी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तरुणीला हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या मजल्यावर हलवण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तिला संबंधित वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं. दरम्यान, पूजा हिला पुन्हा श्वसनाचा त्रास सुरू होतच होता. श्वास कोंडल्यामुळे तिला सतत तहान लागत होती. त्यावेळी तरूणीला ना पाणी देण्यात आलं ना ऑक्सिजन लावण्यात आलं. यावर माझ्या मुलीला निदान पाणी तरी द्या असं वडिलांनी सांगितलं असता ‘आम्ही फक्त टेबलावर काम करतो’ असं उलट उत्तर डॉक्टरांनी दिले. (navi mumbai corona news girl died because of hospital ignorance)

त्याच रात्री पुजाची तब्येत खालावली. त्यामुळे तिला मुंबई शिवडी इथल्या टीबी हॉस्पिटलमध्ये न्या अशी सूचना दिली गेली. टीबी हॉस्पिटलमध्ये पुजाला नेलं असता, डॉक्टरांनी तिला टीबी नसल्याचं सांगून ऑक्सिजनची गरज आहे असं सांगितलं. त्यानंतर पुन्हा तिला केईएम किंवा जे जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला. दरम्यान डॉक्टरांच्या सल्ल्याने पुन्हा पुजाला नवी मुंबईतील डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

अशात या सगळ्या धावपळीत वेळेवर उपचार न झाल्याने हलगर्जीपणामुळे पुजाचा तीन दिवसांत मृत्यू झाला. माझ्या मुलीचा मृत्यू वाशी मनपा हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे झाला असून त्यांच्यावर उचित कारवाई व्हावी याकरिता मुलीच्या वडीलांनी नवी मुंबई आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेतली असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

संबंधित बातम्या – 

‘ई-पॉस मशीन’मुळे कोरोना संसर्गाचा धोका; नागपुरातील रेशन दुकानदारांची राष्ट्रपतींकडे धाव

राज्यात कोरोनाचं सावट, यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा ‘ऑनलाईन’?

(navi mumbai corona news girl died because of hospital ignorance)