मुंबईः नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) यांच्यावर राजद्रोहाची कलमे लावलण्यात आली आहेत, अशी माहिती रविवारी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली. घरत म्हणाले की, राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. कोर्टाने आम्हाला 27 तारखेपर्यंत लेखी युक्तिवाद करायला सांगितला आहे. 29 तारखेला जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. त्यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा आहे. 124 अ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा जन्मठेपच्या शिक्षेचा गुन्हा आहे. त्यांना न्यायालयीन कोठडी दिली आहे. तोपर्यंत ते तुरुंगात राहणार आहेत. राणा दाम्पत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री निवासस्थावर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार असल्याचा इशारा दिला होता. त्यावरून गेले दोन दिवस राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांची राळ उडाली. अखेर मुंबई पोलिसांनी काल रात्री राणा दाम्पत्याला अटक केली. त्यामुळे आता पुन्हा एकदा या वादात भर पडल्याचे दिसून येत आहे. भाजप नेत्यांनी राणा दाम्पत्याची अटक बेकायदा असल्याचे म्हटले आहे.
सरकारी प्रदीप घरत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, हेट, डिस्लाइक करणं, सरकार विरोधात विधान करणं, मुख्यमंत्री आणि सरकारी यंत्रणांना आव्हान दिलं गेले. त्यामुळं राणा दाम्पत्यांविरोधात आम्ही 124 अ अंतर्गत कलम लावलं आहे. आरोपींना 149 ची नोटीस दिली आहे. शांतता ठेवा परत जा, असे आवाह करण्यात आले. मात्र, त्यांनी नोटीसही मानली नाही. शिवाय शासनाला आव्हान दिलं. यातून त्यांचा अप्रामाणिक हेतू दिसून आला. दुसऱ्यांच्या घरात न जाण्यास सांगितलं तरी ते गेले,
वकील रिजवान मर्चंट म्हणाले, राणा दाम्पत्यांवर दोन गुन्हे दाखल झाले आहेत. हनुमान चालिसा जर इतर धर्मियांसमोर म्हंटली असती, तर दोन धर्मात तेढ निर्माण झाली, असं म्हणता आलं असतं. पण जे लोक रामाचे भक्त आहेत. त्यांच्या घरासमोर चालिसा म्हटलं म्हणून गुन्हा घडत नाही. ही बोगस केस आहे. त्याला काही बेस नाही. रामाचं कौतुक केलं, तर त्यात चुकीचं काय. तुम्ही त्यांच्या बाजूला उभं राहून राम भक्ताची स्तुती केली पाहिजे. हा गुन्हा असेल, तर सर्व धर्मियांवर टाळे लागले पाहिजे. आम्ही जामिनासाठी अर्ज केला आहे. 29 तारखेला सुनावणी होणार आहे.
Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!