मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं चॅलेंज स्वीकारलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा दिला होता. नवाब मलिकांनी देवेंद्र फडणवीसांच्या पत्रकार परिषदेनंतर तातडीनं ट्विट करत प्रत्युत्तर दिलं आहे. नवाब मलिकांनी अवघ्या तीन शब्दात फडणवीसांना है तैयार हम असं म्हणत चॅलेंज स्वीकारत असल्याचं म्हटलंय.
है तैयार हम @Dev_Fadnavis
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 1, 2021
नवाब मलिक यांनी महाराष्ट्रात डग्जसंदर्भातील कारवायांचा खेळ सुरु असल्याचा आरोप केलाय. समीर दाऊद वानखेडे जो गेल्या 14 वर्षांपासून या शहरात वेगवेगळ्या विभागांमध्ये कामन करतोय त्यांच्याही बदलीमागे राज्याचे माजी मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस आहेत, असा आरोप नवाब मलिकांनी केला. समीर वानखेडेंना यासाठीच आणलं गेलं होतं की त्यांनी पल्बिसीटी करुन निर्दोष लोकांना फसवावं, असा त्यामागचा उद्देश होता. ड्रग्जचा खेळ मुंबई, गोव्यात सुरु राहावा यासाठी मोठ मोठ्या ड्रग्ज पेडलर्स मग तो काशिफ खान असो त्याला सोडलं जातं, असा आरोप नवाब मलिकांनी केला. नवाब मलिक यांनी जयदीप राणा या व्यक्तीसोबतचे अमृता फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचे फोटो ट्विट करुन थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागलीय. त्यामुळे एनसीबीच्या ड्रग्ज कारवाईपासून सुरु झालेलं प्रकरण आता नवाब मलिक विरुद्ध देवेंद्र फडणवीस इथंपर्यंत येऊन पोहोचलंय.
देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतं जयदीप राणा सोबत अमृता फडणवीस आणि मी देखील फोटो काढले होते. रिव्हरमार्च ही संघटना नदी पुनरुज्जीवन करण्याचं काम करते त्यांनी त्याला हायर केला होता.जाणीवपूर्वक नवाब मलिकांनी अमृता फडणवीस यांचा फोटो ट्विट केला, असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. नवाब मलिक यांनी दिवाळीपूर्वी लवंगी फटाका फोडून मोठा आवाज करण्याचा प्रयत्न केलाय. मात्र, नवाब मलिकांनी लक्षात ठेवावं दिवाळीनंतर बॉम्ब मी फोडेन. मी काचेच्या घरात राहत नाही,त्यामुळे मी या प्रकरणाचे सर्व पुरावे मांडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत याचे पुरावे पाठवणार आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
इतर बातम्या:
Nawab Malik | ड्रग पेडलर जयदीप राणाशी फडणवीसांचे घनिष्ठ संबंध, नवाब मलिकांनी बॉम्ब फोडला
Nawab Malik accepted challenge of Devendra Fadnavis tweet ready for future battle