बापू हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है; नवाब मलिक यांची कालीचरण महाराजांवर टीका

| Updated on: Dec 27, 2021 | 12:06 PM

रायपूर येथील धर्मसंसदेत महात्मा गांधींवर आक्षेपाहार्य टीका केल्यामुळे कालीचरण महाराज अडचणीत आले आहेत. कालीचरण महाराजांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल होताच त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

बापू हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है; नवाब मलिक यांची कालीचरण महाराजांवर टीका
nawab malik
Follow us on

मुंबई: रायपूर येथील धर्मसंसदेत महात्मा गांधींवर आक्षेपाहार्य टीका केल्यामुळे कालीचरण महाराज अडचणीत आले आहेत. कालीचरण महाराजांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल होताच त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनीही कालीचरण महाराजांवर टीका केली आहे. बापू हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है, असं ट्विट करत नवाब मलिक यांनी कालीचरण महाराजांवर निशाणा साधला आहे.

नवाब मलिक यांनी ट्विट करून संताप व्यक्त केला आहे. सत्य, अहिंसेला असत्य आणि हिंसक कधीही पराभूत करू शकत नाहीत. बापू हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है, असं खोचक ट्विट मलिक यांनी केलं आहे.

व्हिडीओत काय?

मलिक यांनी ट्विटसोबत एक व्हिडीओही शेअर केला आहे. हा व्हिडीओ महंत राम सुंदर यांचा असल्याचं सांगितलं जात आहे. कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरल्यानंतर त्यावर महंत राम सुंदर टीका करत आहेत. तसेच या धर्मसंसदेतून ते बाहेर जाताना दिसत आहेत. महंतांच्या या कृतीवर त्यांचं कौतुक होताना या व्हिडीओत दिसत आहे.

काय आहे प्रकरण?

महात्मा गांधींना अकोल्याच्या कालीचरण महाराजांनी अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहिलीय. त्यातले काही शब्द तर इथे लिहिलेही जाऊ शकत नाही. त्यासाठी तुम्ही ट्विटमधला व्हिडीओ पहावा. याच व्हिडीओत कालीचरण महाराजानं गांधीजींना अपशब्द म्हटल्यानंतर नथूराम गोडसेचे आभार मानलेत. त्याच्या कृतीचं अभिनंदन केलंय. देशभरात सध्या विविध ठिकाणी धर्मसंसदेचं आयोजन केलं जातंय. त्यातली छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये जी धर्मसंसद पार पडली, त्यात कालीचरण महाराजानं हे तारे तोडलेत. काँग्रेसच नाही तर अनेक सामाजिक, राजकीय व्यक्तींनी कालीचरण महाराजाविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणी केलीय.

इस्लामचं लक्ष्य राजकारणाच्या माध्यमातून राष्ट्रावर ताबा मिळवणं आहे. आपल्या डोळ्यादेखत 1947मध्ये त्यांनी ताबा मिळवला. त्यांनी आधी इराण, इराक आणि अफगाणिस्तानावर ताबा मिळवला. नंतर राजकारणाच्या माध्यमातून पाकिस्तान आणि बांगलादेशावर ताबा मिळवला. मी नथूराम गोडसेला सलाम करतो. त्यांनी महात्मा गांधींची हत्या केली, असं वादग्रस्त विधान कालीचरण महाराजांनी केलं होतं.

गुन्हा दाखल

देशाच्या फाळणीला महात्मा गांधींनाच जबाबदार धरणाऱ्या कालीचरण महाराजांनी महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरले होते. या प्रकरणी रायपूर महापालिकेचे सभापती प्रमोद दुबे यांच्या तक्रारीवरून टिकरापार पोलीस ठाण्यात कालीचरण महाराजांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

 

संबंधित बातम्या:

Video: ‘ मोहनदास करमचंद गांधीनं सत्यानाश केला’, अकोल्याच्या कालीचरण महाराजावर देशद्रोहाचा खटला चालवण्याची मागणी

Naxal Encounter | तेलंगणा-छत्तीसगढच्या सीमावर्ती भागात चकमक, 11 नक्षलींना कंठस्नान

चेन्नई विमानतळावरून 42 लाखांचे सोने जप्त, तीन जणांना अटक; सीमाशुल्क विभागाची कारवाई