मुंबई : विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज आणखी एक पेन ड्राईव्ह सादर केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी वक्फ बोर्डावर सदस्य म्हणून नेमलं ते मुदस्सीर लांबे हेच आहेत. 31 डिसेंबर 2020 ला त्यांच्या विरोधात एका 33 वर्षीय सामाजिक कार्यकर्तीने बलात्काराची तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला तेव्हा लांबेने लग्न करण्याची तयारी दाखवली आणि गंभीर परिणाम भोगण्याची धमकी या महिलेला दिली, असं फडणवीसांनी सांगितलं. देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांवर नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक (Sana Malik) यांनी ट्विटद्वारे उत्तर दिलं आहे. सना मलिक यांनी मुदस्सीर लांबे हे वक्फ बोर्डात कधी दाखल झाले याची तारीख समोर आणली आहे. याशिवाय त्यांनी मुदस्सीर लांबे यांचा आणि देवेंद्र फडणवीस यांचा फोटो ट्विट केला आहे.
Half Truth is Full Lie!!
Dr. Lambe was appointed a Waqf Board member by Fadnavis/BJP govt on 13 Sept 2019.
MahavikasAghadi govt was established in November 2019. My father got Minority/Waqf Dept in the first week of Jan 2020.@Dev_Fadnavis with D-Gang Relative & a Rape Accused. pic.twitter.com/gMtApDZ5oc— Ar. Sana Malik-Shaikh (@sanamalikshaikh) March 14, 2022
अर्धसत्य हे पूर्ण खोट असतं. डॉ. लांबे यांचीन नियुक्ती देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपच्या सरकारच्या काळात नियुक्ती झाली होती, असं सना मलिक यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडी सरकार नोव्हेंबर 2019 मध्ये आलं होतं. माझ्या वडिलांकडे अल्पसंख्यांक आणि वक्फ विभाग जानेवारी 2020 मध्ये आले आहेत. देवेंद्र फडणवीस हे डी गँगच्या नातेवाईकांच्या आणि बलात्काराचा आरोप असणाऱ्या व्यक्तीसोबत असल्याचा दावा सना मलिक केला. सना मलिक यांनी देवेंद्र फडणवीस आणि डॉ. लांबे यांचा फोटो ट्विट केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात एक पेन ड्राईव्ह सादर करून डॉ. लांबे यांची पोलखोल केली. या पेन ड्राईव्हमध्ये दोन पात्रं आहेत. मोहम्मद अर्शद खान आणि डॉ. मुदीस्सर लांबे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी वक्फ बोर्डावर सदस्य म्हणून नेमलं ते मुदस्सीर लांबे हेच आहेत. 31 डिसेंबर 2020 ला त्यांच्या विरोधात एका 33 वर्षीय सामाजिक कार्यकर्तीने बलात्काराची तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला तेव्हा लांबेने लग्न करण्याची तयारी दाखवली आणि गंभीर परिणाम भोगण्याची धमकी या महिलेला दिली, असं फडणवीसांनी सांगितलं.
अर्शद खान अटकेत आहे. त्याचा मोबाईल जप्त करा. त्यात या दोघांचेही संवाद असून दाऊदबाबतच्या त्यांच्या संबंधाचा त्यात खुलासा आहे. हे संभाषण डिलीट करण्याआधी मोबाईल ताब्यात घ्या, असं सांगतानाच चक्क दाऊदची माणसं तुम्ही वक्फ बोर्डावर नियुक्त केली. अर्थसंकल्पात काही गोष्टी कमी जास्त होतील. पण बॉम्ब स्फोटात असलेल्यांना वक्फ बोर्डावर घेणं कितपत योग्य आहे, असा सवाल फडणवीसांनी केला.
इतर बातम्या
VIDEO | तुम्ही दाऊदची माणसे वक्फ बोर्डात नेमली, फडणवीसांच्या पुराव्याने ठाकरे सरकार धास्तावले